आर. आर. पाटलांच्या मुलाला राष्ट्रवादीत मोठं पद मिळणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं सूचक विधानामुळं रंगली चर्चा
rohit patil
rohit patilesakal
Updated on

सांगली : नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) दिवंगत आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील (Rohit Patil) यांनी कवठेमहांकाळ इथून घवघवीत यश मिळवून दिलं होतं. यापार्श्वभूमीवर रोहित पाटलांना आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महत्वाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे. याबाबतचे संकेतच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिले आहेत. (R R Patil son Rohit Patil may get big post in NCP)

rohit patil
पश्चिम बंगालमध्ये 'नियोजन आयोग' स्थापणार; ममतांची घोषणा

"चांगल्या तरुणांना प्रोत्साहन देण्याचं काम आमच्या पक्षात नेहमीच होतं. पक्षात नवी पिढी आली पाहिजे, त्यांनी नेतृत्वही केलं पाहिजे असा विचार आमचा पक्ष मुळापासूनच करतो आहे" जयंत पाटील यांच्या या विधानामुळं रोहित पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याच्या चर्चेला दुजोरा मिळाला आहे.

rohit patil
'काँग्रेसची अवस्था...', प्रियंका गांधींच्या मुख्यमंत्रिपदाच्या विधानावरून मायावतींची टीका

कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणूक तेवीस वर्षीय रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली होती. या निवडणुकीत त्यांच्या प्रभावशाली कामामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलनं एकहाती सत्ता मिळवली. यामध्ये राष्ट्रवादी पॅनलनं १०, शेतकरी विकास पॅलनं ६ तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला. त्यामुळं राष्ट्रवादीचाच या निवडणूकीत वरचष्मा राहिला.

चित्रा वाघ यांनी केलं होतं रोहित पाटलांचं कौतुक

नगरपंचायत निवडणुकीत मिळवलेल्या यशामुळं भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील रोहित पाटील यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. दिवंगत आर. आर. पाटील अर्थात आबांच्या पावलावर पाऊल टाकत रोहित चांगलं काम करतो आहे. आज जर आबा असते तर त्यांना त्याचा नक्कीच अभिमान वाटला असता अशा शब्दांत वाघ यांनी रोहित पाटलांच कौतुक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.