राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. यादरम्यान जालन्यातील अंतरवली येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत.
मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना राज्यभरातून वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख नेते जालन्यातील घटनास्थळाला भेट देत आहेत. राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी देखील जालन्यात जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली होती. यावरून भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली आहे.
माझी विनंती आहे, आरक्षणासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे. गेल्या सरकारमधल्याच अनास्थेमुळे आरक्षण गेलंय. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात चांगली भूमिका पार पाडली आणि आरक्षण टिकवून ठेवलं होतं. सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
वेगवेगळ्या संघटना प्रयत्न करत आहेत, एकत्रित येत प्रभाविपणे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. माझी मराठा बांधवांना विनंती आहे, आंदोलनाची दखल घेतली आहे. न्यायालयाची प्रक्रिया सुरु आहे, आमचं आवाहन आहे, आंदोलन स्थगित करावं कुठलंही चुकीची पावलं उचलू नये, असं अवाहन देखील त्यांनी दिलं.
विरोधकांचा यासंदर्भात बोलण्याचा काही अधिकार नाही, हे आरक्षण घालवलं कोणी? उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होते ना? तुमच्या सरकारचं अपयश आमच्यावर का फोडताय? मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी शरद पवारांनी कधी प्रयत्न केले? ही सर्व संधीसाधू आणि स्वार्थी लोकं आंदोलनाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत असेही विखे म्हणाले आहेत.
दुपारी १२ वाजता मराठा आरक्षणासंदर्भात बैठक बोलवली आहे, तातडीनं मागण्या आल्या आहेत त्यावर चर्चा होईल मी देखील असेल . अजित दादांची नाराजी असेल असं मला कुठे वाटत नाही, माझं आणि त्यांचे काही बोलणं झालं नाही, असेही विखेंनी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.