Radhakrishna Vikhe Patil: 'फडणवीस जो निर्णय घेतात तो...', गच्छंतीनंतर विखेंची पहिली प्रतिक्रीया

अजित पवार गटाच्या एन्ट्रीने महत्त्वाच्या समितीतून गच्छंती झाल्यावर विखेंची प्रतिक्रीया
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilEsakal
Updated on

मंत्रीमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीमधून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना वगळण्यात आलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ऐवजी अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागली आहे. मंत्रीमंडळ पायाभूत समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उदय सांमत, अतुल सावे, दादा भुसे यांचा सदस्यांमध्ये समावेश आहे.

अजित पवार गटामुळे मंत्रीमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीतून विखे पाटलांची गच्छंती झाल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. मंत्रीमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीमध्ये भाजपाकडून विखे पाटील होते. तर आता राष्ट्रवादीच्या सत्तेतील सहभागामुळे विखे पाटलांना डच्चू मिळाला आहे. त्यांच्याऐवजी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागली आहे.

Radhakrishna Vikhe Patil
Ajit Pawar: अजित पवार गटाच्या एन्ट्रीने विखेंना फटका! मंत्रिमंडळ समितीतून झाली गच्छंती

या संदर्भात विखे पाटलांनी प्रतिक्रीया दिली आहे. यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, 'सर्व गोष्टींचा विचार त्यांना करावा लागतो. आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या समितीमध्ये आहेत. त्यांनी सर्व गोष्टींचा विचार करूनच निर्णय घेतला असेल. तसेच ज्या समितीमध्ये खुद्द देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे मी त्या समितीत असलो, नसलो फरक पडत नाही, असंही ते म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतात तो विचार पूर्वक घेतात. समन्वय रहावे म्हणून कदाचित त्यांनी निर्णय घेतला असावा. त्या समितीत स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळे मी असो किंवा नसो काही फरक पडत नाही असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत.

Radhakrishna Vikhe Patil
Lok sabha Election 2024 : 'चांद्रयानावरून जरी प्रचार केला तरी भाजपचा पराभव अटळ!', सामनातून टीकास्त्र

तर पुढे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी महायुतीमध्ये मतभेद आहेत या वक्तव्यावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, विरोधी पक्षनेता म्हटल्यावर त्यांचकाम आहे बोलणं, पण त्यांनी जरा संयमाने जावं असा माझा त्यांना सल्ला आहे, असंही ते पुढे म्हणाले आहेत.  

तर गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि भाजपमध्ये राष्ट्रवादीच्या सत्तेत येण्यामुळे नाराजीचे सूर ऐकू येत होते. त्याचप्रमाणे आमच्या आधिकारांवर गदा येईल अशी चर्चा सुरू होती. मात्र त्याची सुरूवात झाल्याच्या चर्चा सूरू आहेत. विखे पाटलांच्या जाण्याने अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Radhakrishna Vikhe Patil
Lok sabha Election 2024 : 'चांद्रयानावरून जरी प्रचार केला तरी भाजपचा पराभव अटळ!', सामनातून टीकास्त्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.