स्वत:ला मोठं करण्यासाठी भाजप नेत्या खालच्या थराला ;राष्ट्रवादीचा हल्लाबोल

स्वत:च्या स्वार्थासाठी मुलीचा वापर-स्वाती माने
Chitra wagh
Chitra waghesakal
Updated on

आमदार रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) प्रकरणातील मुलगी गोव्यात सापडली आणि तिने चित्रा वाघ यांच्याशी फोनवर संपर्क साधला हा बनाव आहे. स्वत:ला मोठं करण्यासाठी भाजप नेत्या खालच्या थराला गेल्या आहेत. स्वत:च्या स्वार्थासाठी एखाद्या मुलीचा वापर करणे हे लाच्छनास्पद आहे. महिला आयोगाच्या मुंबई सचिव स्वाती माने (Swati Mane) यांनी या कृत्याचा निषेध व्यक्त केला. आज राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेत चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर राष्ट्रवादीने (NCP) हल्लाबोल केला.

Chitra wagh
आमदार जयकुमार गोरेंसह आणखी दोघांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

स्वाती माने म्हणाल्या, मी या पक्षात येण्यापूर्वी चित्रा वाघ यांच्यासोबत काम केलं आहे. त्या काय बोलू शकतात, काय करू शकतात याचा अंदाज मला आहे. त्यामुळे कुचीक प्रकरणातील मुलीने त्यांना फोन केला हा बनाव असल्याचे तेव्हाच लक्षात आल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर रुपाली चाकणकरांनी याची चौकशी करावी अशी विनंतीही त्यांनी केल्याचे सांगितले. मुळात चित्रा वाघ या कोणत्याही सर्वसामान्याला स्वत:चा नंबर देत नाहीत. दौऱ्यात असताना अनेकांना त्यांचा नंबर म्हणून माझा नंबर दिला आहे. आजही त्यांच्या नावाने माझा नंबर अनेकांकडे सेव्ह असेल असेही त्या म्हणाल्या.

Chitra wagh
फडणवीसांच्या ट्विटनंतर मिटकरी, दरेकरांची प्रतिक्रिया,म्हणाले...

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना कमीतकमी दिवसभरात ४ फोन येतातच. मुलगी पुण्याची आहे. रुपाली चाकणकर या पुण्याच्या १० वर्ष अध्यक्षा असताना तिने त्यांना काॅल न करता, चित्रा वाघ यांना कसा काॅल केला असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. स्वत:च्या स्वार्थासाठी एखाद्या मुलीचा वापर करणे हे लाच्छनास्पद असून, या कृत्याचा त्यांनी निषेध व्यक्त केला.

राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्या विद्या चव्हाण ( Vidya Chavan) म्हणाल्या, 'पुण्याच्या रघुनाथ कुचिक प्रकरणात पीडितेंनी एका चॅनलवर येऊन आरोप केले आहेत. चित्रा वाघ आमच्या पक्षात होत्या. आमच्या सोबत काही महिला आहेत ज्यांनी चित्रा वाघ यांच्यासोबत काम केलं आहे. मात्र, राजकारण किती ही खाली गेलं तरी, महाविकास आघाडी सरकार (MVA) विरोधात काही बोलायचं असं त्यांच सध्या सुरु आहे. मात्र, महिलावर अत्याचार होत असेल तर कोणीही त्याचा समर्थन करू नये. कुचिक प्रकरणात प्रामुख्याने पिडितेवर दबाव टाकून वाघ यांना पाहिजे तशी तक्रार नोंदवून घेतल्याचा आरोप पीडितीने केला असल्याचं चव्हाण म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.