Nanded Deaths : तुमच्या चुकांची शिक्षा गरिबांना का देता? आक्रोश करणाऱ्या 'त्या' महिलेचा व्हिडिओ शेअर करत राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

राज्यातील शासकीय रुग्णालयातील मृत्यूंचा मुद्दा सध्या चांगलाच पेटला आहे.
Rahul Gandhi post slam PM modi over Nanded hospital deaths shares video
Rahul Gandhi post slam PM modi over Nanded hospital deaths shares video
Updated on

सध्या राज्यातील शासकीय रुग्णालयात होणाऱ्या मृत्यूंच्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे. शासकीय रुग्णालयात गैरसोईंमुळे रुग्णांची होणारी हेळसांड, प्रसंगी रुग्णांना जीव गमवावा लागण्याच्या घटना समोर येत आहेत. महाराष्ट्रातील नांदेड तसेच छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यूंच्या घटनेनंतर राजकीय वातावरण पेटलं आहे.

नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात गेल्या तीन दिवसात झालेल्या सुमारे ३७ रुग्णांच्या मृत्यूवरून प्रशासन आणि राज्य सरकारला धारेवर धरलं जात आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना जाब विचारला जात आहे. काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी देखील या प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. इतकेच नाही तर राहुल गांधी यांनी एक हृदयद्रावक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

राहुल गांधींनी 'एक्स' वर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे. पंतप्रधान मोदीजी काळीजाला भेगा पाडणारा नांदेड येथील या गरीब आईचा हंबरडा ऐका. तुम्हच्या गुन्ह्यांची शिक्षा नेहमी गरीबांना का देता? असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला आहे.

Rahul Gandhi Post
Rahul Gandhi Post
Rahul Gandhi post slam PM modi over Nanded hospital deaths shares video
Jitendra Awhad : 'चला झोपेतून तर उठले...'; आण्णा हजारेंचा कोर्टात खेचण्याचा इशाऱ्यावर आव्हाडांनी पुन्हा डिवचलं

नांदेडच्या शासकीय रुग्णलयात अंजली वाघमारे (२२) या महिलेला प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले होते. महिलेची नैसर्गिक प्रसुती होऊन तिने मुलीला जन्म दिला, मात्र दोन दिवसांनंतर अचानक बाळ आणि आई दोघांची तब्यत बिघडली आणि दोघांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं. यानंतर पीडितांच्या कुटुंबियांचा काळजाला घरे करणारा आक्रोश पाहायला मिळाला. याचा व्हिडीओ राहुल गांधी यांनी शेअर केला आहे.

Rahul Gandhi post slam PM modi over Nanded hospital deaths shares video
Maharashtra Politics: 'तू कोण आहे....', एकेरी उल्लेख करत श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

हायकोर्टात स्युओ मोटो याचिका दाखल

दरम्यान शासकीय रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी हायकोर्टाने स्वत:हून या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून स्युओ मोटो याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी उद्या तातडीची सुनावणी आज (शुक्रवारी) होणार आहे. राज्यातील सरकारी रुग्णालयात दोन दिवसांत 41 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. राज्य सरकार या प्रकरणाबाबत हायकोर्टात काय माहिती देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.