Shivsena Constitution: आमदार अपात्रता निर्णय घेताना अध्यक्षांनी घेतला 1999च्या घटनेचा आधार; कशी आहे शिवसेना पक्षाची घटना?

Shivsena party Constitution: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेची १९९९ ची घटना ग्राह्य धरली आहे. या घटनेत ‘शिवसेनाप्रमुख’ पदाचा उल्लेख आहे. तसेच शिवसेना प्रमुखपदाला कोणते अधिकार आहेत, याचाही स्पष्ट उल्लेख आहे.
Shivsena Constitution
Shivsena ConstitutionEsakal
Updated on

मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेची १९९९ ची घटना ग्राह्य धरली आहे. या घटनेत ‘शिवसेनाप्रमुख’ पदाचा उल्लेख आहे. तसेच शिवसेना प्रमुखपदाला कोणते अधिकार आहेत, याचाही स्पष्ट उल्लेख आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे २०१२ साली निधन झाले, त्यानंतर २०१३ मध्ये शिवसेनेच्या घटनेमध्ये बदल करून ‘शिवसेनाप्रमुख’ हे पद गोठविण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ हे एकमेव होते, त्यांच्या पश्चात कोणीही या पदासाठी लायक नाही. अगदी मीसुद्धा नाही,’ असे जाहीर केले. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख हे पद तयार करण्यात आले. मात्र २०१३ आणि २०१८ मध्ये शिवसेनेच्या घटनेत करण्यात आलेले बदल निवडणूक आयोगाने नाकारत शिवसेनेसाठी १९९९ ची घटना ग्राह्य धरण्यात आली. यामध्ये शिवसेना ‘पक्षप्रमुख’ हे पदच नाही.

शिवसेनेची संघटनात्मक रचना

शिवसेना पक्षाच्या घटनेच्या कलम ८ मध्ये संघटनेची रचना कशी असेल हे स्पष्ट करण्यात आले आहे. यातील परिशिष्ट ‘अ’ मधील रचनेनुसार पक्षातील सर्वोच्च पद हे ''शिवसेना प्रमुख'' हे आहे. शिवसेना प्रमुखपदानंतर घटनेनुसार दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रीय कार्यकारिणी आहे. म्हणजे राष्ट्रीय कार्यकारिणीतील पदाधिकारी आणि सदस्यांचा यात समावेश असेल. त्यानंतर पक्षरचनेच्या उतरंडीमध्ये उपनेते, राज्य कार्यकारिणी नंतर राज्यप्रमुख आणि नंतर जिल्हा प्रमुख यांचा समावेश असल्याचा उल्लेख आहे. याशिवाय परिशिष्ट ‘ब’ मध्ये नियुक्तीनुसार काही पदांचा उल्लेख आहे.

त्यात राज्य संपर्क प्रमुख, उपराज्य प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख आणि शाखा प्रमुख अशा प्रकारची यात उतरंड दिलेली आहे. त्याशिवाय शहरांचा विचार करता शहरप्रमुख, विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुख अशा पदांनुसार पक्षाची नेतृत्वाची रचना स्पष्ट करण्यात आलेली आहे. घटनेनुसार यापैकी परिशिष्ट ‘अ’मधील पदाधिकारी निवडणुकीच्या माध्यमातून निवडले जातील आणि परिशिष्ट ‘ब’मधील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाऊ शकते.

Shivsena Constitution
अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाचे दिवे पेटवण्याची जोरदार तयारी सुरू असतानाच महाराष्ट्रात लोकशाहीचे दिवे विझवले; सामनातून टिकास्त्र

शिवसेनेच्या या घटनेच्या कलम १० आणि ११ मध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची रचना आणि पक्षरचनेतील पदाधिकाऱ्यांचे अधिकार याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. या घटनेनुसार पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांपैकीच सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष यांची निवड केली जाऊ शकते. त्याबरोबरच राष्ट्रीय कार्यकारिणीची किमान तीन महिन्यांमधून एकदा बैठक व्हायला हवी.

शिवसेनेच्या घटनेच्या कलम ११ ‘ग’ नुसार पक्षाच्या प्रतिनिधी सभेमध्ये पक्षातील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश असेल. त्यात शिवसेनाप्रमुख, राष्ट्रीय कार्यकारिणी, उपनेते, राज्य संपर्क प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख, राज्य प्रमुख, जिल्हा प्रमुख आणि संसद तसेच विधिमंडळातील निवडून आलेले सदस्य यांचा समावेश असेल. मुंबईच्या विभाग प्रमुखांना जिल्हा प्रमुखांचा दर्जा देऊन त्यांचाही समावेश या प्रतिनिधी सभेमध्ये करण्यात आल्याचा घटनेत उल्लेख आहे. प्रतिनिधी सभेच्या सर्व बैठकांचे अध्यक्ष शिवसेनाप्रमुख असतील. तसेच शिवसेनाप्रमुखांच्या अनुपस्थितीमध्ये प्रतिनिधी सभेच्या सदस्यांनी निवडलेल्या नेत्याकडे बैठकांचे अध्यक्षपद असेल, असाही यात उल्लेख आहे.

Shivsena Constitution
हुकूमशाहीने पक्ष चालवला, जनतेशी बेइमानी केली अन् बाळासाहेबांचे विचार विकले; मुंबईत येताच मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर निशाणा

शिवसेनेच्या १९९९ च्या घटनेनुसार शिवसेनाप्रमुख

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांमधून प्रतिनिधी सभेचे सदस्य शिवसेनाप्रमुखांची निवड करतील. शिवसेनाप्रमुखांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल. शिवसेनाप्रमुख राष्ट्रीय कार्यकारिणीशी सल्लामसलत करून कलम ८ (अनुसूची ब) मध्ये नमूद केलेल्या पक्षाच्या संघटनात्मक रचनेतील कोणत्याही पदाधिकाऱ्याला किंवा सदस्याला काढून टाकू शकतात. त्यांचा निर्णय अंतिम असेल. शिवसेनाप्रमुखांशिवाय अन्य कोणत्याही पदाधिकाऱ्याला कोणत्याही सदस्याची पक्षातून हकालपट्टी करण्याचा अधिकार राहणार नाही.

शिवसेनाप्रमुखांकडील कामे व जबाबदाऱ्या

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकांचे अध्यक्षपद भूषविणे

पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये कामाचे व कर्तव्याचे वाटप करणे

इतर पक्ष/पक्षांशी वाटाघाटींमध्ये भाग घेणे आणि त्या उद्देशाने पक्षाचे प्रतिनिधी/प्रतिनिधी नामनिर्देशित करणे

आवश्यकतेनुसार राष्ट्रीय कार्यकारिणीची आणि/किंवा पक्षाच्या सदस्यांची बैठक आयोजित करणे

Shivsena Constitution
शिंदेंची शिवसेना खरी, मग त्यांच्या व्हीपमुळे ठाकरे गटाचे आमदार अपात्र का नाहीत? राहुल नार्वेकरांनी दिलं स्पष्टीकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.