Irshalwadi Landslide : दुर्घटनेनंतर नागरिकांच्या पुनर्वसनावरून आव्हाड भिडले; गोगावलेंचं प्रत्युत्तर

इर्शाळवाडी येथील दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Irshalwadi Landslide
Irshalwadi LandslideSakal
Updated on

Raigad Khalapur Irshalwadi Landslide : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून एक गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्तापर्यंत या घटनेमध्ये १० जणांचा मृत्यू झाला असून ९८ जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे. अजूनही ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले असून मुसळधार पाऊस आणि गावात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.

या घटनेसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला आहे. यावेळी माध्यमांना बोलताना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. आम्ही सरकारमध्ये असताना तळीये येथील दुर्घटनाग्रस्तांना घरे बांधून दिली पण आता मदत पुनर्वसन विभाग काय करतं ते पहावं लागणार आहे असं ते म्हणाले.

Irshalwadi Landslide
Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

"तळीये येथे झालेल्या दुर्घटनेवेळी आम्ही तेथील वाड्या वस्त्यावर घरे बांधली आहेत. आपण दरवेळी चर्चा करतो. म्हाडातर्फे ३६१ घरे तळीये येथे बांधून तयार आहेत याचा मला आनंद आहे, हे सरकारदेखील नवे घरे बांधून देईल. पुढच्या पिढीला या घटनेमुळे वेदना होणार नाहीत याची काळजी आम्ही घेतली होती." असं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

महसूल खात्यामध्ये नियम आहेत, ज्यांची घरे डोंगराळ भागात आहेत त्यांना दुसरीकडे घरे दिली जावीत. पण आता कोणाला दोष देऊन काय अर्थ नाही. आता मदत पुनर्वसन विभाग काय करत ते महत्वाचं असल्याचं आव्हाड म्हणाले होते.

"आव्हाड म्हणाले की, मी गृहनिर्माण मंत्री असताना घरे बांधून दिली तशी तुम्ही देणार का? मी त्यांना म्हटलं की, तुम्ही मंत्री नाही म्हणून काम होणार नाही असं काही नाहीये. आम्ही घरं बांधून देणार आहोत." असं उत्तर भरत गोगावले यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.