Khalapur Irshalwadi Landslide: काल इथं एक वाडी होती अन् आता मातीचा ढिगारा…; इर्शाळवाडीवर दु:खाचा डोंगर!
Khalapur Irshalwadi Landslide: रायगड जिल्ह्यातील खालापूरच्या इर्शाळवाडी येथे काल रात्री दरड कोसळल्याची माहिती समोर आली आहे. 30 कुटुंब मलब्याखाली अडकल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रायगड जिल्ह्यातील खालापूरच्या इर्शाळवाडी येथे काल रात्री दरड कोसळल्याची माहिती समोर आली आहे. 30 कुटुंब मलब्याखाली अडकल्याची माहिती मिळत आहे.
यामध्ये अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. काल (बुधवारी) रात्री ही घटना घडली आहे. एनडीआरएफच्या 2 पथकांनी घटनास्थळी पोहोचून शोध आणि बचावकार्य सुरू केले आहे.
आतापर्यंत या दरडीखालून 27 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
रात्री गाव झोपलेलं असताना अचानकपणे डोंगराचा काही भाग कोसळला आणि अनेक लोक या ढिगाऱ्याखाली दबली गेली. या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अनेकांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. तर 5 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.
दुर्घटनेबाबत माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या 27 जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर 100 जण अद्याप बेपत्ताच असल्याची माहिती मिळत आहे.
घटनास्थळापर्यंत जाण्याचा रस्त्या अत्यंत निसरडा आहे. तसेच मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे घटनास्थळापर्यंत पोहोचणं अत्यंत कठीण आहे. कशाचीही पर्वा न करता सर्व नातेवाईक घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
शिवदुर्ग, निसर्ग मित्र, वेध सह्याद्री या टीम्स पोलीस प्रशासनाच्या मदतीने मदतकार्यात सक्रिय आहेत. रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू असून अडकलेल्या इतर लोकांना बाहेर काढण्यात येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इर्शाळवाडी गावात दाखल झाले आहेत. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. स्थानिकांशी संवाद साधत ते लोकांना धीर देत आहेत. आमच्या नातेवाईकांना वाचवा, अशी विनंती स्थानिक मुख्यमंत्र्यांकडे करत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.