महापुरानंतर महाडमध्ये नवं संकट; लेप्टोचे 15 रुग्ण आढळले

पूरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनाकडून  युद्धपताळीवर प्रयत्न केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या सुटकेसाठी रायगडमधील महाड येथे हेलिकॉप्टर दाखल झाले आहे.
पूरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनाकडून युद्धपताळीवर प्रयत्न केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या सुटकेसाठी रायगडमधील महाड येथे हेलिकॉप्टर दाखल झाले आहे.
Updated on

गेल्या आठवड्यात मुसळधार पावासाने रायगडला झोडपलं होतं. महापूराचं संकट ओढावलेल्या महाडमधील तळीये गावात दरड कोसळून 84 जणांचा मृत्यू झाला होता. या संकटातून सावरणाऱ्या महाडवासियांना आता आणखी एका संकटाला सामोरं जावं लागत आहे. दरड कोसळणे, महापूर आणि कोरोनानंतर लेप्टोसह इतर संसर्गजन्य आजार बळावल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूरानंतर महाडमध्ये लेफ्टो स्पायरेसीसचे 15 रुग्ण आढळले आहेत. तर तीन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या भागात आरोग्य व्यवस्थता तैनात करण्यात आली असून आजारग्रस्तांवर योग्य ते उपचार सुरु आहेत.

20 ते 23 या चार दिवसात आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळला. या पावसामुळे महाड आणि पोलादपूर परिसरला महापूराचा तडाखा बसला. आता महापूर ओसरला आहे. मात्र, महापूर ओसरल्यानंर परिसरात चिखल आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणी चिखलाचा एक ते दीड फूटांचा थर जमा झाला होता. धान्य कुजल्यामुळे दुर्गंधीही पसरली होती. पूरामुळे शेकडो जनावरेही मृत होऊन पडली होती. त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जातेय.

पूरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनाकडून  युद्धपताळीवर प्रयत्न केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या सुटकेसाठी रायगडमधील महाड येथे हेलिकॉप्टर दाखल झाले आहे.
HSC Result 2021 : बारावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?

महाड आणि पोलादपूर येथील पूरानंतरची भयावह परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी तात्काळ पावलं उचलली आहेत. महाड येथे 11 ठिकाणी तर पोलादपूर येथे दोन ठिकाणी आरोग्य तपासणीचं काम सुरु करण्यात आलं आहे. डेंग्यू, मलेरिया, लेप्टो स्पायरेसीस, काविळ आणि कोरोना तसेच इतर जलजन्य आजारांची तपासणी या ठिकाणी केली जात आहे.

पूरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनाकडून  युद्धपताळीवर प्रयत्न केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या सुटकेसाठी रायगडमधील महाड येथे हेलिकॉप्टर दाखल झाले आहे.
"...तर CM ठाकरेच नव्हे, PM मोदीही तुमच्याकडे येतील"
पूरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनाकडून  युद्धपताळीवर प्रयत्न केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या सुटकेसाठी रायगडमधील महाड येथे हेलिकॉप्टर दाखल झाले आहे.
पगार, EMI पासून ATM शुल्कापर्यंत उद्यापासून बदलणार नियम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()