Video Viral : महापूर.. सर्वत्र पाणीच पाणी, तरीही तो जिद्दीने पोहत राहिला अन् वाचला; व्हिडीओ पाहा

Maharashtra Rain Updates : पुणे, कोकण आणि मुंबईला गुरुवारी पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळित झाले. पुण्यात दोन दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसाने गुरुवारी पहाटेपासून चांगलाच जोर पकडला होता. त्यामुळे धरणसाठ्यामध्ये वाढ होऊन खडकवासला धरणातून विसर्ग सोडावा लागला. जुलै महिन्यात एका दिवसात पडणाऱ्या शहरातील तिसऱ्या सर्वांत मोठ्या पावसाची नोंद गुरुवारी सकाळी झाली.
rain updates
rain updatesesakal
Updated on

रायगडः राज्यामध्ये बुधवारी मध्यरात्री आणि गुरुवारी दिवसभर पावसाने जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे अनेक नद्या दुथडी भरुन वाहात आहेत. तर काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे आणि मुंबईमध्ये तर जनजीवन विस्कळीत झालं असून काही भाग चक्क पाण्याखाली गेले आहेत.

गुरुवारी रायगडमधला एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. उल्हास नदीला आलेला महापूर, पुरामध्ये जिकडे-बघावं तिकडे पाणीच पाणी. अशा स्थितीत एक तरुण पुरामध्ये वाहात होता. अनेकांनी तो वाचणार नाही, असं म्हटलं. परंतु त्या तरुणाला जीवनदान मिळालं आहे.

उल्हास नदीमध्ये वाहून गेलेल्या तरुणाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. या तरुणाचं नाव महेंद्र पवार असं आहे. हा तरुण कर्जत तालुक्यातील बेंडशे गावाचा रहिवासी आहे. त्याचा पुराच्या पाण्यात वाहून जातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मध्य महाराष्ट्राला, विशेषत: पुणे, कोकण आणि मुंबईला गुरुवारी पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळित झाले. पुण्यात दोन दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसाने गुरुवारी पहाटेपासून चांगलाच जोर पकडला होता. त्यामुळे धरणसाठ्यामध्ये वाढ होऊन खडकवासला धरणातून विसर्ग सोडावा लागला. जुलै महिन्यात एका दिवसात पडणाऱ्या शहरातील तिसऱ्या सर्वांत मोठ्या पावसाची नोंद गुरुवारी सकाळी झाली.

मुंबईसह परिसराला मुसळधारेचा फटका बसला. संततधारेमुळे जागोजागी पाणी साचल्याने आणि नद्यांना पूर आल्याने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमधील जनजीवन विस्कळित झाले आहे. कर्जतच्या उल्हास नदीला पूर आल्याने शंभर गावांचा संपर्क तुटला आहे. ठाणे जिल्ह्यात पावसाची कोसळधार सुरूच असल्याने ठाणे जिल्ह्याभोवती पुराचा वेढा वाढला आहे. उल्हास, काळू नदीने रौद्ररूप धारण केले असून अवघ्या काही तासांतच इशारा पातळीवर असलेल्या या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. काठावरील गावे, शहरांना जबरदस्त तडाखा बसण्याचा धोका निर्माण झाला आहे. पालघर जिल्ह्यातील वसई परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे सखल भागात पाणी साचले. पावसाचे पाणी मार्गावर साचल्याने ६० लोकल फेऱ्‍या रद्द करण्यात आल्या.

पुण्यात तिघांचा मृत्यू

नदीपात्रातील पाणी वाढल्याने अंडा भुर्जीची गाडी सुरक्षितस्थळी हलविताना विजेचा धक्का लागून पुण्यात तीन तरुणांचा मृत्यू झाला. भिडे पुलाजवळील पुलाची वाडी परिसरात गुरुवारी (ता. २५) पहाटे तीनच्या सुमारास घडली. हे तिघे एका अंडा भुर्जीच्या गाडीवर काम करीत होते. अभिषेक घाणेकर (वय २५), आकाश माने (वय २१) आणि नेपाळी कामगार शिवा परिहार (वय १८) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.