Railway News: वारकऱ्यांसाठी 64 आषाढी स्पेशल ट्रेन; वाचा कधी आणि कुठून सुटणार गाड्या

Ashadi Ekadashi 2024: आषाढी विशेष गाड्याचे आरक्षण ७ जुलै २०२४ पासून भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत केंद्रावर सुरु होणार आहे.
Railway News: वारकऱ्यांसाठी  ६४  आषाढी स्पेशल ट्रेन; वाचा कधी आणि कुठून सुटणार गाड्या
Railway sakal
Updated on

Railway News: आषाढी अकादशीनिमित्य पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेने ६४ आषाढी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या आषाढी विशेष गाड्या नागपूर ते मिरज, अमरावती ते पंढरपूर, खामगाव ते पंढरपूर, लातूर ते पंढरपूर,भुसावळ ते पंढरपूर दरम्यान धावणार आहे. त्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Railway News: वारकऱ्यांसाठी  ६४  आषाढी स्पेशल ट्रेन; वाचा कधी आणि कुठून सुटणार गाड्या
Train accidents in India: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवांच्या कारकिर्दीत झालेत भीषण अपघात! राजीनाम्याची सतत मागणी, मात्र....

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०१२०५ नागपूर - मिरज आषाढी विशेष गाडी १४ जुलै २०२४ रोजी नागपूर येथून सकाळी ८.५० वाजता सुटेल आणि मिरज येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५५ वाजता पोहोचेल.तर, ट्रेन क्रमांक ट्रेन क्रमांक ०१२०६ मिरज - नागपूर आषाढी विशेष गाडी १८ जुलै २०२४ रोजी मिरज येथून दुपारी १२.५५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १२.२५ वाजता पोहोचेल.

Railway News: वारकऱ्यांसाठी  ६४  आषाढी स्पेशल ट्रेन; वाचा कधी आणि कुठून सुटणार गाड्या
Railway Police Bharti: पुणे लोहमार्ग पोलिस भरतीची रविवारी होणार लेखी परिक्षा; उमेदवारांनी कोणती काळजी घ्यावी? जाणून घ्या

तर, ट्रेन क्रमांक ०१२०७ नागपूर - मिरज विशेष गाडी १५ जुलै २०२४ रोजी नागपूर येथून सकाळी ८.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५५ वाजता मिरज येथे पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01208 विशेष गाडी १९ जुलै २०२४ रोजी मिरज येथून दुपारी १२.५५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १२.२५ वाजता पोहोचेल. यासोबतच .नवी अमरावती - पंढरपूर विशेष ४ फेऱ्या, खामगाव - पंढरपूर विशेष चार फेऱ्या, लातूर - पंढरपूर १० फेऱ्या , भुसावळ - पंढरपूर अनारक्षित विशेष दोन फेऱ्या, मिरज - पंढरपूर अनारक्षित मेमू विशेषच्या २० फेऱ्या आणि मिरज - कुर्डूवाडी अनारक्षित मेमू विशेष २० फेऱ्या अशा एकूण मध्य रेल्वेने ६४ आषाढी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

यासर्व आषाढी विशेष गाड्याचे आरक्षण ७ जुलै २०२४ पासून भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत केंद्रावर सुरु होणार आहे.

Railway News: वारकऱ्यांसाठी  ६४  आषाढी स्पेशल ट्रेन; वाचा कधी आणि कुठून सुटणार गाड्या
Train Accident: फक्त नितीश कुमार नाही तर या दोन रेल्वेमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून दिलेला राजीनामा! कोण होते ते?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.