Railway: वंदे भारतसाठी यंदाची दिवाळी ठरली गोड; तब्बल इतक्या प्रवाशांनी केला प्रवास

Vande Bharat: मुंबई-सोलापूर आणि मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत ट्रेनला मिळाली सर्वाधिक पसंती
vande bharat
vande bharat esakal
Updated on

Vande Bharat: दिवाळीच्या हंगामात मध्य रेल्वेच्या पाच ‘वंदे भारत’ ट्रेनना प्रवाशांनी तुफान प्रतिसाद दिला. पंधरा दिवसांत मध्य रेल्वेच्या सीएसएमटी-शिर्डी, सोलापूर, गोवा, नागपूर-बिलासपूर आणि नागपूर-इंदूर ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसमधून ६८ हजार ७३६ प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.

vande bharat
Vande Bharat Railway : खुशखबर! मध्य रेल्वेवर आणखी दोन वंदे भारत ट्रेन; मुंबई ते संभाजीनगर, पुणे ते सिकंदराबाद मार्गावर धावणार

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात ७५ वंदे भारत एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहेत. सीएसएमटी-शिर्डी, सीएसएमटी-सोलापूर, सीएसएमटी-मडगाव, नागपूर-बिलासपूर आणि नागपूर-इंदूर अशा पाचही वंदे भारत एक्स्प्रेसना प्रवाशांची पसंती मिळत आहे. दिवाळीत पाचही एक्स्प्रेसना प्रवाशांनी तुफान प्रतिसाद दिला. १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान तब्बल ६८ हजार ७३६ प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून मध्य रेल्वेला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळाला. सर्वाधिक पसंती मुंबई-सोलापूर आणि मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत ट्रेनला मिळाली.

vande bharat
Vande Bharat train Video: वंदे भारत ट्रेनचा घातपात करण्याचा कट; लोको पायलटने आपात्कालीन ब्रेक मारल्याने अनर्थ टळला

१ ते १५ नोव्हेंबरदरम्यानचे प्रवासी
- सीएसएमटी-शिर्डी ः ११,१८९ - शिर्डी-सीएसएमटी ः ८८५४
- सीएसएमटी-सोलापूर ः १३,३४० - सोलापूर-सीएसएमटी ः १३,३४०
- नागपूर - बिलासपूर ः ६४९५ - बिलासपूर-नागपूर ः ६५११
- सीएसएमटी-मडगाव ः ६३८७ - गोवा मडगाव-सीएसएमटी ः ६३२७
- नागपूर-इंदूर ः ४७२० - इंदूर-नागपूर ः ४९१३

vande bharat
Vande Bharat Train Food: वंदे भारत ट्रेनमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण; प्रवाशांच्या वाढल्या तक्रारी!  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.