Railway News: पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने गेल्या वर्षभरात एक हजार ९६ आरोपींना अटक केली आहे.
त्यांच्याकडून सुमारे ५२. ३५ लाख रुपयांची रेल्वे मालमत्तेची चोरी जप्त करण्यात आली.
यापैकी सुमारे आठ प्रकरणांमध्ये, जप्त केलेल्या चोरीच्या मालमत्तेची किंमत एक लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की,पश्चिम रेल्वेचा सुरक्षा दलाने जवान आपल्या प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देत त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
सन २०२३ मध्ये १०९४ गुन्हेगार पकडले गेले आणि सुमारे ५२.३५ लाख रुपयांची रेल्वे मालमत्तेची चोरी जप्त करण्यात आली. २०२३ वर्षाच्या काही उल्लेखनीय कारवाईची माहिती देताना सुमित ठाकूर यांनी सांगितले की, आरपीएफ अंधेरी पथकाच्या गुन्हे प्रतिबंध व तपास पथकाने (सीपीडीसी ) सब स्टेशनमधील कार्यरत नसलेल्या ट्रान्सफॉर्मरमधून कॉपर वायर चोरीला गेल्याच्या माहितीवरून कारवाई केली.
घटनेच्या रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, घटनेच्या वेळी एक चारचाकी वाहन आढळून आले. चारचाकीचा मागोवा घेतल्यानंतर आरपीएफ पथकाने ०१ रिसीव्हरसह एकूण १३ आरोपींना अटक केली आणि तीन लाखांपेक्षा जास्त किमतीची ५२० किलो चोरी गेल्या तांब्याचा तार शंभर टक्के जप्त केला आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.