Railway News: स्वातंत्र्य दिनानिमित्त मध्यरेल्वे नागपूर,कोल्हापूरसाठी सोडणार विशेष गाड्या!

Mumbai Nagpur Kolhapur Special Train : या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा आहे. मात्र, या सुविधेसाठी प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
Railway News: स्वातंत्र्य दिनानिमित्त मध्यरेल्वे नागपूर,कोल्हापूरसाठी सोडणार विशेष गाड्या!
Updated on

Mumbai Latest Update: स्वातंत्र्यदिनापासून सलग सुट्यांमुळे बाहेर जाण्याच्या विचारात असलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने १४ स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई ते नागपूर आणि कोल्हापूरपर्यंत ही सुविधा असल्याने या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा आहे. मात्र, या सुविधेसाठी प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

०२१३० एलटीटी-नागपूर एसी सुपरफास्ट स्पेशल ट्रेन गुरुवार १५ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजून २५ मिनिटांनी सुटून नागपूरला दुपारी साडेतीन वाजता पोहोचणार आहे. परतीकरिता ०२१४० ट्रेन १६ ऑगस्ट रोजी नागपूर येथून दुपारी दीड वाजता निघून एलटीटीला दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून १० मिनिटांनी येणार आहे. या ट्रेनला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा स्थानकात थांबा दिला आहे.

Railway News: स्वातंत्र्य दिनानिमित्त मध्यरेल्वे नागपूर,कोल्हापूरसाठी सोडणार विशेष गाड्या!
रेल्वेच्या खोदकामात तीन वेळा वीजवाहिनीचे नुकसान

तर ०१४१७ सीएसएमटी-कोल्हापूर स्पेशल ट्रेन २० ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजून २० मिनिटांनी निघून कोल्हापूरला दुपारी दीड वाजता पोहोचणार आहे. तर ११४१८ ट्रेन १८ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता सुटून सीएसएमटीला दुसऱ्या दिवशी दुपारी दीड वाजता येणार आहे. या ट्रेनला कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली आणि मिरज स्थानकात थांबा दिला आहे. याशिवाय ०२१४३-४४ पुणे - नागपूर एसी सुपरफास्ट आणि ०६५३३-३४ कलबुर्गी-बेंगळूर दरम्यान स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहे.

Railway News: स्वातंत्र्य दिनानिमित्त मध्यरेल्वे नागपूर,कोल्हापूरसाठी सोडणार विशेष गाड्या!
Railway: महत्वाची बातमी, कोकण रेल्वेच्या 'या' गाड्या दादरपर्यंत धावणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.