Maharashtra Rain Update : राज्यात आजपासून पुन्हा पावसाची शक्यात; कुठे कसं असेल हवामान? वाचा

Rain Alert in Vidarbha : पावसाने राज्यात सध्या विश्रांती घेतल्याचे चित्र आहे, पण राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तायरा झाल्याची स्थिती पाहायला मिळत आहे.
Rain Update
Rain Updateesakal
Updated on

पावसाने राज्यात सध्या विश्रांती घेतल्याचे चित्र आहे, पण राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तायरा झाल्याची स्थिती पाहायला मिळत आहे. यामुळे आज (बुधवार)पासून चार दिवस राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही दिवसांपासून नंदूरबार येथे खिळलेला परतीचा पाऊस येत्या काही दिवसात राज्यात सर्वदूर हजेरी लावण्याची शक्यता आहे.

राज्यात आज कुठे पाऊस होणार?

विदर्भातील ११ जिल्ह्यात तर नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा १० जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे मुंबईसह संपूर्ण कोकण आणि मराठवाडा क्षेत्रात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह किरकोळ पावसाची शक्यता आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनने आतापर्यंत जम्मू आणि काश्मीर, लडाख-गिलगिट-बाल्टीस्तान-मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणा, तसेच चंदीगड दिल्ली, राजस्थानच्या सर्व भागातून माघार घेतली आहे. याशिवाय उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागातूनही मान्सून माघारी परतला आहे.

Rain Update
Jammu Kashmir Election : ३७० हटवल्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपचा पराभव! ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री

मान्सूनने आतापर्यंत पूर्णपणे माघार घेतलेली नाही. गेल्या ४ दिवसापासून नंदुरबारमध्ये खिळलेला परतीचा पाऊस पुढील ४८ तासांत महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात वाटचाल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे हवामान विभागाने राज्यातील विवीध जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. तर उद्या म्हणजेच गुरूवारीही कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहणार असून उन्हाचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.

Rain Update
IND vs NZ, Test: भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा! लॅथमकडे नेतृत्व, तर विलियम्सन उशीराने येणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.