Monsoon : राज्यात पावसाचा जोर शुक्रवारनंतर काहीसा वाढण्याची शक्यता

राज्यात पश्चिमी वाऱ्यांची तीव्रता कमी असली तरी दक्षिण गुजरात वाऱ्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. या प्रभावामुळे उत्तर कोकण- महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.
monsoon
monsoonsakal
Updated on

पुणे - राज्यात पश्चिमी वाऱ्यांची तीव्रता कमी असली तरी दक्षिण गुजरात वाऱ्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. या प्रभावामुळे उत्तर कोकण- महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. दरम्यान, येत्या शुक्रवारपासून (ता.२५) पश्चिमी वाऱ्यांची तीव्रता वाढणार असल्याने त्या पुढील दोन-तीन दिवस पावसाच्या प्रमाणात वाढ होईल, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेशसह बिहार, पश्चिम बंगाल, सिक्किम येथे पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. दरम्यान, कोकण-गोव्यात पुढील पाच दिवस बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस असेल.

मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेजगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. पुणे आणि परिसरात गुरुवारपासून (ता. २४) ते मंगळवारपर्यंत (ता. २९) वातावरण ढगाळ राहील. तर मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.