Explainer : राज्यात विविध भागात मुसळधार पावसाचं कारण काय? जाणून घ्या

पुणे प्रादेशिक हवामान विभागानं याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
Rain
Rain
Updated on

पुणे : महाराष्ट्रातील दक्षिण भागातील कोल्हापूर, सांगली या भागत आज सकाळी मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्याचबरोबर पुणे, नगरसह कोकण भागातही ढगाळ वातावरण आहे. पण या अवकाळी पावसाचं नेमकं कारण काय? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. पुणे प्रादेशिक हवामान विभागानं याचं स्पष्टीकरण दिलं आहे. (Rain Update Heavy rains in various parts of Maharashtra what is reason behind this explain by IMD)

Rain
Kartiki Ekadashi : "कार्तिकी यात्रेसाठी उपमुख्यमंत्र्यांना येऊ देणार नाही", मराठा आंदोलक आक्रमक; मंदिर समितीचा सावध पवित्रा

पाऊस नेमका कशामुळं पडतोय?

वेधशाळेच्या माहितीनुसार, "पूर्व-मध्य अरबी समुद्रावर असलेल्या हवेच्या चक्रीय स्थितीचं रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झालं आहे. त्याची वाटचाल पश्चिमेकडं आहे, कमी दाबाच्या क्षेत्रामुळं राज्यात दक्षिणपुर्वेकडून (आग्नेय) येणाऱ्या वाऱ्यामुळं राज्याच्या दक्षिण भागात मेघगर्जनेसह पावसानं हजेरी लावली. तसेच पुन्हा इथं पावसाची शक्यता आहे. (Latest Marathi News)

Rain
Cabinet Decisions: धनगरांच्या उत्कर्षासाठी योजना ते एअर इंडियाची इमारत ताब्यात घेणार; पाहा मंत्रिमंडळाचे निर्णय

महाराष्ट्रातील हवामान कसं?

उर्वरित भागात आकाश अंशतः ढगाळ राहिल तसेच हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. कोकण पट्ट्यातील गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी इथं ८ ते १० तारखेला मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. रायगडमध्ये आज अतिहलक्या ते हलक्या पावसाची शक्यता आहे तसेच गोवा व सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेनं दिला आहे. (Marathi Tajya Batmya)

Rain
Fossil Fuels: जागतिक तापमानवाढ रोखण्याचा प्रयत्नांना खो? 2030 पर्यंत 110 टक्के जीवाश्म इंधनात होणार वाढ

१० तारखेपर्यंत पावसाची शक्यता

कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापुरात ८ ते १० तारखेला मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. पुणे व अहमदनगरमध्ये ८ ते ९ तारखेला अतिहलका पाऊस तर आज बीड, लातूर, धाराशीवमध्ये अतिहलक्या पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे.

Rain
Rain Update: पुढील काही तासांत राज्यात पावसाची शक्यता; 13 जिल्ह्यात सरी बरसणार, छत्री-रेनकोट घेऊनच बाहेर पडा

पुण्यात दिवाळीच्या काळात तापमानात घट?

पुणे जिल्हा व पुणे शहरात ८ ते १० तारखेला आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दोन दिवस आकाश सामन्यतः ढगाळ तसेच अतिहलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच ८ ते १० तारखेला सकाळी धुकं पडण्याची शक्यता आहे. ११ तारखेनंतर हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं दिवाळीच्या काळात किमान तापमानात साधारण २ डिग्रीनं घट होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.