Koyna Dam Update : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या 'कोयना'च्या पाणी पातळीत वाढ; धरणात 'इतक्या' TMC साठ्याची नोंद

कोयनेत ४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
Koyna Dam
Koyna Damesakal
Updated on
Summary

राधानगरी तालुक्यात पावसाचा जोर कायम असून, आज तिसऱ्या दिवशीही अतीवृष्टीची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस तुळशी धरण क्षेत्रावर १२८ मिलीमिटर नोंदला आहे.

Koyna Dam Water Level Update : जिल्ह्याच्या पश्चिम भागात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर जिल्ह्यात काल पावसाचा जोर ओसरला. धोम- बलकवडी, कोयना धरण (Koyna Dam) भागात दिवसभरात कधी उघडीप तर कधी पावसाची रिमझिम बरसात होत होती.

कोयनेत ४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, धरणात ३९.०१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. नवजा परिसरात २६ मिलिमीटर तर महाबळेश्वरला ३८ मिलिमीटर पाऊस झाला असून, सायंकाळपासून पाऊस सुरू झाला आहे.

Koyna Dam
Kolhapur Flood : कोल्हापुरात पूरसदृश परिस्थिती; 59 बंधारे पाण्याखाली, आज-उद्या Yellow Alert

पाटण तालुक्यात बुधवारी दिवसभर धो-धो पाऊस कोसळत होता. काल पुन्हा पावसाचा जोर कमी झाला. पावसाच्या सरी येत होत्या. मात्र, जोर नव्हता. दिवसभर उघडीप पाऊस असा खेळ चालला होता. मात्र, धरण क्षेत्रात संततधार पाऊस पडत आहे.

दरम्यान, हवामान खात्याने चार दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला होता, त्यामुळं प्रांताधिकारी सुनील गाढे, तहसीलदार रमेश पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी रात्रभर कोयनानगर येथे ठाण मांडून होते. रात्री उशिरा प्रशासनाने काडोली येथील पुलाची पाहणी केली. पावसाचा जोर कमी झाल्याने नदीच्या पाणीपातळीत आज घट झाली आहे. सलग दोन दिवस मुसळधार पावसामुळे विस्कळित झालेलं आहे.

Koyna Dam
Kolhapur Gold Biscuits : तळ्याकाठी खेळताना मुलांना सापडली 24 लाख किमतीची सोन्याची बिस्किटे; 'त्यांना' सुगावा लागताच..

कहाडला उघडीप

दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने काल उघडीप दिली. मात्र, दिवसभरात अधूनमधून हलक्या पावसाच्या सरी कोसळत होत्या. आज पावसाने उघडीप दिल्यामुळे बळीराजाने शिवारातील पेरणीची व टोकणीची राहिलेली कामे करण्याचा प्रारंभ केला. दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोयना व कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. उत्तरमांड, दक्षिणमांड, वांग, तारळी या अन्य उपनद्या व ओढे, नाले भरून वाहू लागले आहेत.

Koyna Dam
Bhuibawada Ghat : खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील भुईबावडा घाटात कोसळल्या दरडी; वाहतूक काही काळ ठप्प

राधानगरी धरण 66 टक्के भरले

राधानगरी तालुक्यात पावसाचा जोर कायम असून, आज तिसऱ्या दिवशीही अतीवृष्टीची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस तुळशी धरण क्षेत्रावर १२८ मिलीमिटर नोंदला आहे. पाणी पातळी वाढ असल्याने राधानगरी धरणातून वीज निर्मितीसाठी सध्या १२०० क्यूसेक पाणी भोगावती नदीपत्रात सुरू आहे. हे धरण ६६ टक्के भरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.