Rain Update Maharashtra: पुढचे ४८ तास कोकणासाठी धोक्याचे, 'या' जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट

Rain Update Maharashtra
Rain Update Maharashtra
Updated on

Rain Update Maharashtra : मान्सून महाराष्ट्रात सक्रिय आहे. पुढे आठवडाभर ओडिशा, आंध्रच्या किनारपट्टीवर सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून पुढेचे दोन दिवस ते पच्छिमेकडे सरकून जमीनावर येण्याची शक्यता आहे.

त्यापाठोपाठ २४ जुलैला बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आयमडीने वर्तवली आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात मौसमी वाऱ्यांचा जोर कायम राहणार आहे.

कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट क्षेत्रांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो. पुढचे ४८ तास कोकणासाठी धोक्याचा असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Rain Update Maharashtra
WI vs IND 2nd Test : भारताला झगडावे लागणार! 'विराट' शतकानंतर विंडीजनेही केले जोरदार पुनरागमन

पालघर, ठाणे, रायगड, सातारा जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. अतीवृष्टीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

मुंबईत देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत अजूनही संततधार सुरू आहे. काल शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. 

मराठवाड्यासह विदर्भात देखील पावसाने धुमाकूळ घातला आहे. नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदीया जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अर्लट दिला आहे. त्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. 

Rain Update Maharashtra
Ajit Pawar Birthday : मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की... मिटकरींचे ट्विट व्हायरल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.