Rain Update: पुणे, मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; घाटांतील प्रवाशांना 'सतर्क'तेचा इशारा

माळशेज घाट, खंडाळा घाटातून प्रवास करणाऱ्यांना सावधगिरीचा इशारा
file photo
file photosakal
Updated on

पुणे, मुंबईसह राज्यभरातील अनेक जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा इशारा 'सतर्क' या हवामान विषयक माहिती देणाऱ्या संस्थेनं दिला आहे. त्याचबरोबर माळशेज घाट आणि खंडाळा घाटातून प्रवास करणाऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. (Rain Update by Satark Chance of heavy rain across Maharashtra including Pune Mumbai)

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid03639HTmMt3vidu9HLVgakXsm3cBtiD7AEqc1a5Fz1QzaAAzfDYfTmZQL4hakcCc9el&id=100070116468876&mibextid=2JQ9oc

सतर्कच्या माहितीनुसार, पुणे (दौंड, शिरूर, हवेली, जुन्नर, मावळ, पुणे शहर, पिंपरी चिंचवड), अहमदनगर, नाशिक, ठाणे, पालघर, रायगड, मुंबई आणि उपनगरे, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर इथल्या काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. (Latest Marathi News)

https://m.facebook.com/photo.php?fbid=630757052604838&id=100070116468876&set=a.384152353931977&eav=AfYF-dRk1ASmMP0LrNoM3nP8qf_-zSCI0LWA-8PrJjb6_jfoiC-gEq4qxOiKz9vRpq0&paipv=0&source=48

घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस

दरम्यान, मावळ, आंबेगाव, जुन्नर तालुक्यांत काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी फ्लॅशफ्लड सारखी स्थिती तयार होऊ शकते. त्याचबरोबर माळशेजघाट, खंडाळाघाट येथून प्रवास करताना नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. कारण मुसळधार पावसामुळं डोंगरावरून दगड, माती घसरून येण्याची, झाडे पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.