कोयना धरणाचा एकूण पाणीसाठा ८२.७६ टीएमसी झाला असून, जलाशयात प्रतिसेकंद फक्त चार हजार ७४ क्युसेक पाण्याची आवक होत आहे.
पाटण : कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात सलग चौथ्या दिवशी पावसाने विश्रांती घेतली आहे. गेल्या २४ तासांत कोयनानगर व नवजाला दहा मिलिमीटर आणि महाबळेश्वरला (Mahabaleshwar) २५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
कोयना धरणाचा एकूण पाणीसाठा ८२.७६ टीएमसी झाला असून, जलाशयात प्रतिसेकंद फक्त चार हजार ७४ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. पावसाने विश्रांती घेतली असल्यामुळे जलाशयात होणारी पाण्याची आवक कमी झाली आहे.
काल सकाळी दहा वाजता पायथा वीजगृहातील दोन जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून कोयना नदीपात्रात करण्यात येणारा विसर्ग कोयना धरण व्यवस्थापनाने बंद केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.