Rain Update Today: महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईला येलो अलर्ट, पंचगंगा धोक्याच्या पातळीजवळ

Maharashtra Mumbai Rain Weather Update: महाराष्ट्राचा देखील यात समावेश आहे. मुंबई आणि दिल्लीसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील कोकण भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
Rain Update
Rain Update
Updated on

Maharashtra Rain Update: भारतीय हवामान विभागाने बुधवारी अनेक राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्राचा देखील यात समावेश आहे. मुंबई आणि दिल्लीसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील कोकण भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुढील तीन ते चार दिवस पावसाची स्थिती कायम राहण्याची स्थिती आहे.

मुंबईतील पावसाचा स्थिती काय?

मुंबईला झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर मंगळवारी काहीसा ओसरला होता. दिवसभरात केवळ १३ मिमी पावसाची नोंद झाली. पुढील चार दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा मात्र कायम आहे. बुधवारी सकाळपासून अनेक भागात पावसाची रिमझीम सुरु आहे. याचा परिणाम रेल्वेच्या तिन्ही मार्गावर झाला आहे. तिन्ही मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत.

Rain Update
Nashik Rain Update : रिमझिम पावसाने रस्त्यांची चाळण! बेशिस्त पार्किंगमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

मंगळवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत १३.७४ मिमी पावसाची नोंद झाली. कुलाबा १४.२; तर सांताक्रूझ १५.८ मिमी पावसाची नोंद झाली. शहर ८९, पूर्व उपनगर १७.९३, तर पश्चिम उपनगरात १८.४२ मिमी पाऊस झाला.

Rain Update
Kolhapur Rain Update : पंचगंगा धोका पातळीकडे; कोल्हापूर जिल्ह्याच्‍या सर्व भागांत संततधार; वाहतूक ठप्प

कोल्हापूरमध्ये पुराची स्थिती!

कोल्हापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरु आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये पुराचा धोका निर्माण झाला आहे. पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीपासून फक्त १ फूट खाली आहे. ४३ फूटाची मर्यादा ओलांडल्यानंतर ती धोकादायक पातळी मानली जाते. त्यामुळे ही चिंता वाढवणारी गोष्ट आहे.

कोल्हापूरमधून जाणाऱ्या रेल्वेसेवेवर देखील परिणाम झाला आहे. अनेक गाड्या मिरजमार्गे वळवण्यात आले आहेत. शिवाय, कोल्लापूरमधून जाणारे महामार्ग अंदाज घेऊन बंद करण्यात येत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे पंचगगा धोकादायक पातळीवर गेली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. २०१९, २०२१ मधील स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये अशीच अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.