पुणे : राज्यभरात डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी अवकाळी पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली. संततधारेने गहू, हरभरा, द्राक्षे, आंबा, काजू आदी पीकांचे मोठे नुकसान झाले. त्याचप्रमाणे, ऊसतोडीवरही पावसाचा परिणाम झाला. प्रतिकूल हवामानामुळे बळीराजा धास्तावला आहे.
पुणे :
पुणे शहर आणि परिसरात पावसाने झोडपलं आहे
नोकरदारांची तारांबळ उडाल्याचं दिसून आलं.
अनेकांच्या वाहतुकीची गैरसोय तसेच ट्राफीक जाममुळेही नागरिक त्रस्त झाले.
मुंबई
नोकरदारांची पावसामुळे कोंडी
दाट धुक्यांमुळे मध्य रेल्वेच्या गाड्यांना विलंब
मच्छिमारांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी
मराठवाडा
मराठवाड्यात सर्वत्र ढगाळ वातावरण
औरंगाबाद शहरात पावसाचा शिडकावा
सातारा
महाबळेश्वरमध्ये स्ट्रॅाबेरीचे पावसाने नुकसान
ढगाळ वातावरण, पावसाने द्राक्ष, आंब्याचेही नुकसान
हरभरा, गहू पिकांचे पावसाने नुकसान, ऊसतोड ठप्प
कोल्हापूर
दिवसभर ढगाळ वातावरण, सायंकाळी पाऊस
खरिपाची अंतिम टप्यात आलेली सुगी खोळंबली
साखर कारखान्यांच्या उसतोडींना फटका; गुऱ्हाळे बंद
रब्बी हंगामाच्या पेरण्यांना मात्र हा पाऊस पोषक
सांगली
शहर-जिल्ह्यात ढगाळ वातावरण; पाऊस नाही
ढगाळ हवामानाचा द्राक्षांवर मोठा परिणाम शक्य
सिंधुदुर्ग
आंबा व काजूच्या पिकांना मोठा फटका
मासेमारीवर तुर्तास परिणाम नाही, परंतु पावसाळी वातावरण कायम राहिल्यास भविष्यात परिणाम होऊ शकतो.
रत्नागिरी
पहाटेपासूनच पावसाला सुरूवात
आंबा आणि काजू बागायतदार चिंतेत
आणखी दोन दिवस पावसाचा इशारा
खराब हवामानामुळे मच्छीमारी ठप्प
पालघर
जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले, शेतकरी, मच्छीमार, व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान
बदलत्या हवामानामुळे रब्बी पिकावर विषाणूजन्य रोगांचा प्रभाव होण्याची शक्यता.
वीटभट्टी व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान.
ठाणे
पावसामुळे डेंगी, मलेरिया रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता
कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे हाल
ग्रामीण भागातील भाजीपाला व कडधान्याच्या रोपांचे मोठे नुकसान.
भाजणीसाठी तयार केलेल्या विटा भिजल्याने वीटभट्टी मालक हवालदील
रायगड
अवकाळी पावसाने शेतीची दाणदाण; भात, कांदा, आंबा पिकाचे मोठे नुकसान होण्याची भीती
नवी मुंबईत नोकरदार, व्यापाऱ्यांना फटका, वातावरणात कमालीचा गारवा
नाशिक
जिल्ह्याला अवकाळीचा जोरदार तडाखा, पावसाने द्राक्ष, कांदा आणि टोमॅटोला फटका
भाजीपाल्याचेही मोठे नुकसान
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.