Rain Updates : घाट रस्त्याने प्रवास टाळा; पुढील १२ तासांमध्ये कमी वेळेत जास्त पाऊस कोसळण्याची शक्यता

Heavy Rain file photo
Heavy Rain file photoesakal
Updated on

मुंबईः पुढील बारा तासांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. पाच जिल्ह्यांमध्ये कमी वेळेत जास्त पाऊस कोसळू शकतो. त्यामुळे घाट रस्त्याने प्रवास टाळावा, असं आवाहन करण्यात आलेलं आहे.

हवामनविषयक अभ्यास करणाऱ्या सतर्क संस्थेने पावसाचे अपडेट्स दिलेले आहेत. रविवार दि. १ ऑक्टोबर रोजी साडेचार वाजल्यापासून पुढे १२ तास मुसळधार पावसाची शक्यता आहे.

यामध्ये सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, पुणे- घाट क्षेत्रामध्ये काही ठिकाणी कमी वेळात जास्त पावसाची शक्यता आहे. यामध्ये झाडं उन्मळून पडणे, दरड कोसळणे, डोंगरावरुन माती वाहून येणे अशा घटना घडू शकतात.

Heavy Rain file photo
Video : ''ही वाघनखं शिवाजी महाराजांच्या वापरातील नाहीत'', इंद्रजित सावंत नेमकं काय म्हणाले?

त्यामुळे पावसाचं प्रमाण कमी होईपर्यंत घाट रस्त्यांनी प्रवास न करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. दरड कोसळून अपघात होण्याचे प्रमाण पावसाळ्यामध्ये होत असतं. त्यामुळे प्रवास करताना काळजी घेणं आवश्यक आहे.

मागच्या आठवड्यापासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. मराठवाड्यात खरीपाची पिकांना पाण्याची तूट जाणवली. मात्र रब्बीसाठी पाण्याची सोय झालीय. आता पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.