राज्यात पावसाचा अंदाज; पुण्यात तापमान घटले

Rain-Environment
Rain-Environmentesakal
Updated on

पुणे : राज्यात रविवारपासून (ता. २५) तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. चंद्रपूर येथे गुरुवारी सर्वाधिक कमाल तापमान ४१.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुण्यात कमाल तापमानाचा पारा ३७.७ अंश सेल्सिअस नोंदला.

मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग ते दक्षिण तमिळनाडू दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत असून, काही भागांत ढगाळ वातावरण तयार होत आहे. तुरळक ठिकाणी सरी बरसत आहे. रविवारी (ता. २५) व सोमवारी (ता. २६) सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत पूर्वमोसमी पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

Rain-Environment
पुण्यातील रुग्णालयांचे ‘सुरक्षा ऑडिट’ राम भरोसे; सक्षम यंत्रणेचा अभाव
Rain-Environment
संशयाचं भूत; नको तिथं सूत!

राज्यात सतत बदलत असलेल्या वातावरणामुळे कमाल तापमान कमी-जास्त होत आहे. मागील चार ते पाच दिवस ४३ अंश सेल्सिअसपर्यंत गेलेला पारा पुन्हा काही अंशी कमी झाला आहे. सध्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली. गुरुवारी सकाळी चोवीस तासांत विदर्भातील चंद्रपूर येथे सर्वाधिक ४१ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. कमाल तापमानाबरोबर किमान तापमान कमीअधिक होत आहे. मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे सर्वांत कमी १९.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.

पुण्यात तापमान घटले

पुण्यात कमाल तापमानात गुरुवारी ०.५ अंश सेल्सिअसने घट होऊन ३७.७ अंश सेल्सिअस नोंदले गेले. शहर आणि परिसरात शुक्रवारी (ता. २३) आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर शनिवारपासून (ता. २४) पुढील तीन दिवस दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला.

Related Stories

No stories found.