राज्यात मागील काही दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावली. जोरदार पावसामुळे राज्याच्या अनेक भागात ओढे, नाले, नद्या दुधडी भरून वाहत आहेत. अनेक भागांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र सध्या राज्यातील पाऊस काही प्रमाणात कमी झाला आहे. अनेक भागात पूर ओसरण्यास, सुरूवात झाली आहे.
जुलै महिन्यात मुसळधार कोसळल्यानंतर आता पावसाने ऑगस्टच्या सुरुवातीस मात्र दडी मारल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील काही भाग वगळता पावसाचे प्रमाण तुरळक असेल असा अंदाज हवामान विभागानेही वर्तवला आहे.
पुढील दोन दिवसांसाठी राज्याच्या कोणत्याही जिल्ह्यांना रेड किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही. पण, काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला असून त्या भागांमध्ये पावसाच्या मध्यम ते तुरळक सरी बरसतील असंही सांगण्यात आलं आहे.
कोकण आणि विदर्भात पावसाच्या मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल. तर काही भागांमध्ये मात्र उघडीप पाहायला मिळेल. कोल्हापुरात परिस्थिती वेगळी असून, राधानगरी धरणाचे तीन दरवाजे पुन्हा उघडण्यात आले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. आता पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पूर ओसरण्यास सूरूवात झाली आहे.
तर 2 ऑगस्टपासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार ओडिशा जवळील कमी दाबाच्या क्षेत्राचे अवशेष पुढील काही दिवसांमध्ये पश्चिम बंगाल जवळ सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३ ते ९ ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये पावासाचा जोर कमी असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.