Raj Thackeray Amit Shah Meeting: मनसेच्या महायुतीला ग्रीन सिग्नल, नांदगावकरांची उमेदवारी कशी फायद्याची ठरणार?

Raj Thackeray Amit Shah Meeting: ट्रिपल इंजिन महायुतीला मनसेच इंजिन जोडलं जाणार? राज ठाकरेंच्या भेटीत भाजपची ऑफर काय? अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत जागावाटपाचा तिढा सुटणार?
Raj Thackeray Amit Shah Meeting
Raj Thackeray Amit Shah MeetingEsakal
Updated on

Raj Thackeray Amit Shah Meeting: लोकसभा निवडणूका काही दिवसांवर येऊन ठेपल्यात. अशात काही जागांचे वाटप जरी झाले असलं तरी अनेक ठिकाणी युती- आघाडीमुळे जागा वाटपाचा तिढा कायम आहे. महाविकास आघाडीत अजुनही खलबत सुरु आहेत तर भापजने आतापर्यंत २० उमेदवारांची घोषणा केली असली तर इतर २८ जागांचं काय असा प्रश्न निर्माण झालाय. कारण अनेक जागांवरून शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरु आहे. त्यात स्थानिक राजकारणामुळे अजित पवार गटाची सुद्धा चांगलीच गोची होतीये. हे सगळं सुरु असतानाच आता शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप यांच्या महायुतीमध्ये चौथा भिडू जोडला जाणार असल्याचं बोललं जात आहे.

राज ठाकरे यांचा मनसेचा एनडीएमध्ये समावेश होण्याची चिन्हे आहेत. याच पार्श्वभुमीवर राज ठाकरेंनी दिल्ली गाठलीये तिथे भाजप नेते अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर या राजयुतीचं चित्र स्पष्ट होईल पण आधीच दोन पक्ष सोबत असताना भाजपने मनसेला सोबत घेण्यामागचं कारण काय? मनसेला कोणत्या जागा मिळणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया सविस्तर.

दिल्लीतल्या भाजप मुख्यालयात केंद्रीय मंत्री अमित, शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, महाराष्ट्र भाजप कोअर समितीचे सदस्य फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बैठक झाली. राज्यातील उरलेल्या २८ जागांचे काय करायचं? महायुतीच्या घटक पक्षांमध्ये त्या जागांचे कसं वाटप करायचं? याच उरलेल्या ठिकाणची राजकीय परिस्थिती काय? इच्छूक भाजप उमेदवारांच काय?

यावर त्यांची चर्चा झाली. यानंतर सगळ्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत बैठक होऊन त्यात महायुतीचा जागावाटपाचा सोक्षमोक्ष लागणार असल्याचं बोललं जात आहे आणि या सगळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील दिल्लीत पोहोचले तसं पाहिलं तर गेल्या चार दिवसांत राज ठाकरे हे दुसऱ्यांदा दिल्लीत दाखल झाल्याचं बोललं जात आहे.

Raj Thackeray Amit Shah Meeting
Shivaji Adhalrao: अजित पवारांकडून आढळरावांना शिरुरमधून उमेदवारी निश्चित; दिलीप मोहितेंनी घेतली नरमाईची भूमिका

महायुतीत मनसेला घेण्याच्या निर्णयावर जवळपास सर्व मित्रपक्षांचे एकमत झाल्याचंही समजतंय. यातचं राज ठाकरे जेव्हा दिल्लीत पोहोचले तेव्हा भाजप नेते विनोद तावडे हे राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले आणि याच भेटीमुळे आता मनसे देखील महायुतीशी जोडली जाणार हे जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात आहे.

आता मनसे भाजपसोबत जाणार या चर्चा काही आत्ता सुरु झाल्या असं नाही, गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही बाजूनं हालचाली सुरु होत्या. मनसेला महायुतीत सामील करून घ्यायचं यासाठी भाजप आग्रही होतं. त्यासाठी आशिष शेलार आणि फडणवीसांनी हालचाली सुद्धा सुरु केल्या होत्या. आता आशिष शेलार आणि राज ठाकरेंची मैत्री ही सगळ्यांना चांगलीच ठावूक आहे. काही दिवसांपुर्वीच राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात गुप्त बैठकही झाली होती. या बैठकीत नेमकी कशासाठी होती याच कारण स्पष्ट झालं नाही. कारण याबाबत राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा म्हणाले की, 'माझा विषय वेगळा आहे. ज्यावेळी निवडणुकीवर बोलायचं आहे तेव्हा मी निवडणुकीवर बोलेल', असं म्हणत विषय टाळला. पण, शेलारांनी ठाकरेंना केंद्रीय नेतृत्वाचा निरोप दिल्याचं बोललं आणि मनसे महायुतीत सामील होणार या चर्चा सुरु झाल्या.

Raj Thackeray Amit Shah Meeting
Maharashtra Weather Update: विदर्भ-मराठवाड्यात आजही अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा; तुमच्या भागात काय परिस्थिती जाणून घ्या

या सगळ्यात राज ठाकरेंनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा एकूणच भाजपविरोधात सुर आवळला होता. पंतप्रधानांविरोधात होणारी प्रखर टीका कुठेतरी कमी झाल्याचं दिसत होतं. पण गेल्या काही दिवसात फडणवीसांनी देखील राज ठाकरेंशी मनसेच्या नेत्यांशी भेटीगाठी वाढवल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज ठाकरेंच्या प्रश्नावर लवकरचं चित्र स्पष्ट होईल असं कोड्यात बोलून अनेक चर्चांना वाट करून दिली होती.

दरम्यान, ही लोकसभा लढवायची नाही असं मत मनसेच्या काही वरिष्ठ नेत्यांनी मांडल्याचं बोललं जात होतं. यासाठी राज ठाकरेंनी मतदारसंघाचा आढावा देखील मागून घेतला होता. यानंतरच फडणवीसांनी संपर्क साधला. बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांनी फडणवीसांची भेट घेतल्याच्या चर्चा कोणापासून लपून राहिल्या नव्हत्या. यंदाच्या लोकसभेला निवडणुकीत प्रत्यक्ष मैदानात उतरायचे की भाजपला पाठिंबा द्यायचा यावर दोन्ही पक्षांचे नेते विचार करीत असल्याचं बोललं जातं.

Raj Thackeray Amit Shah Meeting
Bacchu Kadu: बच्चू कडूंना मोठा दिलासा! हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा रद्द; कोर्टानं दिले 'हे' महत्वाचे निर्देश

पण ‘मनसे’ने दक्षिण मुंबई, रत्नागिरी आणि शिर्डी या तीन मतदारसंघांपैकी एक जागा लढविण्याचा प्रस्ताव भाजपने ठेवला आहे. मुंबईतील मराठी मतांच्या बेगमीसाठी ‘मनसे’ने दक्षिण मुंबईची जागा लढविणे महायुतीला उपयोगाचे ठरेल असे भाजपचे मत आहे. बाळा नांदगावकर येथून उभे राहिल्यास त्यांना मोठा प्रतिसाद मिळू शकतो, असे बोललं जातं.

आता दक्षिण मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून अरविंद सावंत यांना पुन्हा एकदा उमेदवारी फिक्स असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीकडून मनसेचा उमेदवार रिंगणात उतरला तर पुन्हा ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना पाहायला मिळू शकतो.

आता भाजपसोबत शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असताना त्यामानाने संख्याबळ कमी असलेल्या मनसेची साथ कशासाठी हवी तर.

Raj Thackeray Amit Shah Meeting
काँग्रेसचा उमेदवार विजयी कसा होईल? मताधिक्यासाठी बालेकिल्ल्यात काँग्रेसला बांधावी लागणार मोट; ‘शहर मध्य’मधील मताधिक्य निर्णायक; ‘MIM’च्या भूमिकेकडे लक्ष

लोकसभेनंतर मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांकडे भाजपने लक्ष्य केंद्रित केल्याचं दिसून येतंय आणि मनसेला सोबत घेऊन भाजप येणाऱ्या निवडणुकांना सामोरं गेल्यानं भाजपला अर्थात फायदा होणार आहे आणि विषय दक्षिण मुंबईचं बोलायचं तर शिवसेनाचा बालेकिल्ला जरी असला तर नांदगावरकर हा फॅक्टर शिवसेनेला तोडीतोड ठरू शकतो. त्यात नाशिक, पुणे व मुंबई या भागांमध्ये मनसेचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे तिथंही भाजपला एकूणच महायुतीला फायदा होणार आहे.एकंदरित येत्या स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभेला मनसेचा महायुतीला फायदा होईल.

पण या सगळ्यात मनसेचा काय फायदा होणार तर

मनसे हा पक्ष सध्या कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याचं बोललं जातंय. कारण मनसेच्या इतिहासात लोकसभेत अजुन एकही खासदार नाही. विधानसभेचं बोलायचं तर २००९ साली चागंली बाजी मारत १३ आमदार निवडणून आले होते. नाशिक महानरपालिकेवर तर एकहाती सत्ता मिळवली होती. पण त्यानंतर पक्षाला उतरती कळा आली. सध्याचं चित्र सांगायचं तर राज्यात पक्षाचा केवळ एक आमदार आहे. अशात जर मनसे महायुतीत सामील झाला आणि बाळा नांदगावरकांना खासदारकी मिळाली तर पक्षाला केंद्रात आवाज मिळेल आणि पक्ष पुन्हा उभारायला संधी मिळेल.

त्यात राज ठाकरे यांच्या वाट्याला लोकसभा निवडणुकीत फारशा जागा येणार नसल्या तरीसुद्धा महायुतीत विधानपरिषद आणि विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना चांगल्या जागा मिळू शकतात, असं बोललं जातंय आणि विधानपरिषद आणि विधानसभेत महायुतीचा साथ मिळाल्यानं मनसेला पुन्हा एकदा उभारी मिळू शकतो आणि मनसेला अच्छे दिन येऊ शकतात.

Raj Thackeray Amit Shah Meeting
Prakash Ambedkar: मविआत जागा वाटपावरून गोंधळ! प्रकाश आंबेडकरांची थेट काँग्रेसला ऑफर...वंचितची नेमकी भूमिका काय?

यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठरणार तो ठाकरे फॅक्टर महायुतीशी जोडला जाणार

उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडली आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं पण यानंतर शिवसेनेत फुट पडली. या फुटीचा फायदा कुठेतरी ठाकरेंना झाला आणि भाजपची खेळी टिकेच्या भोवऱ्यात सापडली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाकरेंना माननारा एक अजूनही आहे. अशात उद्धव ठाकरे जरी नसले तरी राज ठाकरेंना सोबत घेऊन पुन्हा एकदा ठाकरे फॅक्टर भाजपला फायद्याचा ठरेल. कारण राज ठाकरेंनी अनेक वर्षांपासून हिंदुत्वाच्या मुद्दयावर असेल किंवा मराठी माणसाच्या मुद्दयावर आपली बाजू भक्कमपणे मांडली आहे.

या सगळ्या गोष्टी पाहता, मनसे आणि महायुती दोन्ही बाजू ही युती फलदायी ठरणार असल्याची चिन्ह आहेत. पण आता मनसे महायुतीत सामील झाली तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.