महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यातल्या सभेची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. आता काही वेळातच पुण्यातल्या गणेश कला क्रीडा मंच इथं ही सभा होणार आहे. या सभेची जोरदार तयारी सध्या सुरू असून या सभेत राज ठाकरे कोणावर तोफ डागणार, काय खुलासे करणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे. गेले काही दिवस पुणे हे मनसेच्या राजकीय हालचालींचे केंद्र बनले आहे.
वसंत मोरेंची नाराजी व इतर अनेक कारणांमुळे राज ठाकरेंनी आपलं लक्ष पुण्याकडे केंद्रित केले आहे. आज जरी पुणे मनसे मध्ये नाराजीनाट्य सुरू असलं तरी एकेकाळी राज ठाकरेंचा एक खंदा शिलेदार इथे मनसेचा दबदबा राखून होता. ते होते राज ठाकरे ज्यांना आपला वाघ म्हणून उल्लेख करायचे असे सोनेरी आमदार रमेश वांजळे.
महाराष्ट्राच्या राजकारणात 2009 विधानसभा निवडणूकमध्ये एक सोनेरी अध्याय लिहिला गेला. त्यावेळेस राजकारणानं अनेक लाटा आल्या आणि ओसल्या, राजकारणात भुकंप पण झाले. त्या भुकंपतुन सावरत काहींने नेतृत्त्वाचे शिखर घाटले. त्या स्मरणीय शिखरावर नाव लिहल्या गेलं रमेश वांजळे. शिवसेना पक्ष सोडून राज ठाकरे २००६ ला बाहेर पडले. एक एक दिवस महाराष्ट्र पिंजून काढला आणि पक्षाची स्थापना केली. आणि विधानसभा निवडणूक २००९ साठी स्वतःला तयार केलं. पहिल्याच विधानसभा निवडणूकीत राज ठाकरेंचा करिझ्मा कामी आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोठी मजल मारत १३ आमदार निवडूण आणले. त्यातलं एक नाव होतं गोल्डन मॅन रमेश वांझळे. गोल्डन मॅन रमेश वांजळे यांचा आमदार पर्यंतचा प्रवास...
रमेश वांजळे हे मूळचे अहिरे गावचे त्यांच बालपण पण तेथेच गेलं. वांजळे यांच्या कुटुंब गावातील एक प्रतिष्ठित कुटुंब आहे. त्यांचे वडील हे गावचे सरपंच असल्याने राजकारणाचे धडे लहानपणापासून मिळाली. वांजळे यांना लहानपणी तालमीत जाण्याची फार आवड होती. त्यामुळे त्यांनी चांगली तब्येत कमावली. त्यांचे शरीरसौष्ठव चांगले असल्याने त्यांना पिंपरी चिंचवड महापालिकेत वॉचमन म्हणून नोकरी मिळाली. वाकड येथील स्मशानभूमीत काही काळ त्यांनी नोकरी केली. परंतु त्यांची नोकरी जास्त काळ टिकली नाही.
रमेश वांजळेच्या आयुष्याला कलाटणी देणारे काही वळण मिळाले. त्यांना रामकृष्ण मोरेंच्या रुपात गुरु मिळाला. वांझळे यांनी अहिरे गावच्या संरपंच पदाच्या निवडणूक लढवली. आणि विजय मिळवून ते सरपंचपदी विराजमान झाले. त्यापुढं कॉंग्रेसकडून पंचायत समिती लढवली ती पण जिंकत समितीच्या उपसभापती पदी विराजमान झाले. राजकारणात माघार घेणे हा प्रकार त्यांना माहिती नव्हता. पुढे त्यांची पत्नी हर्षदा वांजळे जिल्हा परिषद गट महिलांसाठी राखीव झाल्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आणि मोठ्या मताने निवडून आल्या.
त्याच दरम्यान विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. खडकवासला हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने त्यांना पक्ष बदलणे हा एकमेव पर्याय होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरवातीला उमेदवारी मागितली पण राष्ट्रवादीने त्यांची उमेदवारी नाकारली. त्यानंतर त्यांनी शिवसेना व भाजपाकडेही उमेदवारी मागितली पण त्यांच्याकडूनही त्यांना नाकरालं. शेवटी रेल्वइंजीन आपलं मानलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रस्ता धरला आणि राज ठाकरे यांना उमेदवारी मागितली. राज यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत उमेदवारी दिली.
खडकवासलाचे आमदार वांजळेच होतील अशी चर्चा सुरुवातीपासूनच होती. अंगावरील सोन्यामुळं त्यांना तर चक्क वृत्तवाहिन्यांनी गोल्डमॅन ही पदवी बहाल करून टाकली. महाराष्ट्रमध्ये हळू हळू रमेश वांझळे गोल्डमॅन म्हणून प्रसिद्ध झाले. रमेश वांजळे यांची खरी ताकद म्हणजे त्याचे कार्यकर्ते होते. त्यांच्या उत्कृष्ट भाषण शैलीमुळे मतदारावर चांगली प्रभाव पडला. आणि त्यांचा निवडणूकित मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. विधीमंडळात वांजळे यांनी शपथ घेतली.
ज्युस विक्रीतून व्यवसायाला सुरुवात करणारे वांजळे नंतर जमिन खरेदी विक्रीत करायला सुरवात केले. अनेक गरिबांना काशी यात्रा करून आणल्या. मुस्लिम बंधू-भगिनींना अजमेरची यात्रेला नेले. पण या आमदाराचा २०११ला हृदयविकारानं मृत्यू झाला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात स्वतंत्र अध्याय वांजळेंच्या नावानं लिहला जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.