'..तुमच्या घरी रेड का पडत नाही?'; राज ठाकरेंचा सुप्रिया सुळेंना प्रतिप्रश्न

Raj Thackeray Meeting
Raj Thackeray MeetingE sakal
Updated on

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पाडवा मेळ्याव्यात केलेल्या भाषणानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते, यानंतर आता आज राज ठाकरे यांची ठाण्यात उत्तर सभा होत आहे, या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांवरुन पुन्हा चौफेर फटकेबाजीला केली. त्यांनी मागच्या सभेनंतर आलेल्या नेत्यांच्या प्रतिक्रिया वाचून दाखवत त्यांचा समाचार घेतला.

राज ठाकरे यांनी त्यांच्या पाडवा मेळाव्यातील भाषणानंतर नेत्यांकडून आलेल्या प्रतिक्रियांवर सडकून टिका केली. त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले की, "सुप्रिया सुळे म्हणतात, लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटिशीने बदलतील याचं मला आश्चर्य वाटतं. म्हणजे मी" असं सुप्रिया सुळे यांचं विधान वाचून दाखवत, राज ठाकरे म्हणाले की, "मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी रेड पडते, पण तुमच्या घरी रेड पडत नाही याचं कारण मला कळेल का? महाराष्ट्रात एक-एक माणूस पोहोचवला की पवार साहेब मोदींची भेट घेतात, पुढचा माणूस सांगायला. देशमुख गेले, मग परत एक भेट घेतली. अजितचं काय? मग रेड टाकल्या. त्यानंतर परत भेट घेतली, नवाब मलिक फाजीलपणा जास्त करतोय. मग नवाब मलिक. नंतर आता संजय राऊतांवर बोलले असं म्हणे. "

Raj Thackeray Meeting
राज ठाकरेंचा इशारा; म्हणाले, वेळ आली तर मोदींवरही बोलेल

पुढे राज ठाकरे म्हणाले की, "आत काय बोलले माहीत नाही. मी त्यांच्या वाढदिवसाच्या भाषणात बोललो होतो की शरद पवार खूश झाले म्हणजे भीती वाटायला लागते. आज शरद पवार संजय राऊतांवर खूश आहेत. कधी टांगलेला दिसेल कळणार पण नाही. यात अनेक काँग्रेसवाले गेलेत. मग उशिरा समजतं की तेव्हा ते बोलले होते, ते आज लागलंय."

अजित पवारांच्या घरी रेड पडते, त्यांच्या सख्या बहिणींच्या घरी रेड पडते, त्याच्यानंतरही पवार साहेब आणि नरेंद्र मोदी यांच्यात मधूर संबंध राहतात कसं काय? मी पवार साहेबांना कधी भडकलेलं बघीतलं नाही. असे राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray Meeting
"मोदींनी 'या' दोन मागण्या पूर्ण कराव्यात देशावर उपकार होतील"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.