'अयोध्या दौऱ्याच्या घोषणेनंतर ज्या काही राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या तो एक ट्रॅप होता'
अयोध्या दौऱ्याला विरोध हा ट्रॅप असून महाराष्ट्रातून यासाठी रसद पुरवली जात आहे, असा आरोप मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. ते आज पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात बोलत होते. यावेळी अयोध्येचा दौरा का स्थगित केला याचीही कारणं राज यांनी स्पष्ट केलं आहे. मला राम जन्मभूमीचं दर्शन घ्यायचं होतं. राजकारणात भावना समजत नाहीत. ऐन निवडणुकीवेळी महाराष्टातील मनसेच्या कार्यकर्त्यांमागे कोर्ट कचेरीच्या गोष्टी मागे लावल्या असत्या. उत्तर प्रदेशातील एका खासदाराला आव्हान देणं शक्य आहे का?, असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.
यावेळी सभेत त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. ते म्हणाले, माझ्या पायाचं दुखणं वाढलं असल्यानं कंबरेला त्रास होतो आहे. त्यामुळे येत्या १ जूनला शस्त्रक्रिया करणार आहे. अयोध्या दौरा तात्पुरता स्थगित केल्यानंतर अनेकांना वाईट वाटलं आहे. अनेकजण यावर कुत्सितपणे बोलायला लागेलत पण, मुद्दाम त्यांना बोलण्यासाठी दोन दिवस वेळ दिला आहे.
आज यासंदर्भातील भूमिका सांगण्यासाठी मनसेने ही सभा घेतली आहे. माझ्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेनंतर ज्या काही राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या तो एक ट्रॅप होता. त्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरविण्यात आली आहे. अयोध्यावारी खुपणाऱ्यांनी हे काम केलं आहे, असा टोला त्यांनी महाविकास आघाडी सरकारला नाव न घेता लगावला आहे.
पुढे ते म्हणाले, आयोध्या दौऱ्यासाठी जे वातावरण उभा केलं जातयं त्यावरुन तिथे काही झालं असतं तर आपले कार्यकर्ते अंगावर गेले असते. कार्यकर्त्यांच्या मागे केसेस आणि तुरुंगाचा ससेमिरा लावला असता. त्यामुळे मी माझे कार्येकर्ते असे हकनाक घालवणार नाही, असेही ते म्हणाले. ऐन निवडणुकीवेळी सत्ताधाऱ्यांनी या गोष्टी मागे लावून आपल्याला अडचणीत आणले असते. एका खासदाराला आव्हान देणं शक्य आहे का? आयोध्या दौऱ्याचा सगळा ट्रॅप असून या सगळ्यात महाराष्ट्रातली ताकद हकनाक अडकली असती, म्हणूनही हा दौरा स्थगित केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे
दरम्यान, सभेदरम्यान बोलताना राज ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीला राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांना टोला लगावला. निवडणुका नाही काही नाही उगाच कशाला भिजत भाषण करायचं, असंही ते म्हणाले आहेत. राणा दाम्पत्य आणि शिवसेनेत इतका राडा झाला. त्यानंतर संजय राऊत आणि रवी राणा हे लेहमध्ये जेवण करताना दिसले. मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचण्यासाठी आलेल्यांसोबत तुम्ही फिरताय. हे सर्व ढोंगी आहेत. यांचं हिंदूत्व फक्त बोलण्यापुरतं आहे, असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.