Raj Thackrey: भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी केलं तर चालतं पण मी बोललो तर देशविरोधी? राज ठाकरेंची टीका

Raj Thackrey
Raj Thackrey Esakal
Updated on

आज पनवेलमध्ये मनसेचा निर्धार मेळावा पार पडत आहे. यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. यावेळी राज ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे.

राज ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले की, 'आपल्याकडे राज्यात कोणी कुठेही जमिनी घेत आहे. आता मी तुम्हाला 2023 ची गोष्ट सांगत आहे. 2023 मध्ये गोव्यात एक कायदा करण्यात आला आहे. गोव्यात शेतजमीन सहज कोणाला मिळणार नाही. जर घेतलीच तर तिथे तुम्हाला शेतीच करावी लागणार. उद्योग, व्यावसाय करता येणार नाही. तिथे भाजपची सत्ता आहे.'

Raj Thackrey
Raj Thackeray Panvel: भाजपने दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायला शिकावं; टोल प्रकरणावर राज ठाकरेंचा पलटवार

' तिथे भाजपचे मुख्यमंत्री असा कायदा करतात. तर गोव्याचे मुख्यमंत्री म्हणतात आम्ही गोव्याचा गुरगाव किंवा छत्तीसपूर होऊ देणार नाही. म्हणजे गोव्याचे मुख्यमंत्री सांगतात आम्ही उत्तरेतून येणाऱ्या लोंकाना आमच्या इथे असणारी जमिन देणार नाही हा त्याचा अर्थ, आणि जर या मुद्द्यावर राज ठाकरे बोलला, तर राज ठाकरे देशविरोधी होतो असं म्हणत राज ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

Raj Thackrey
Raj Thackeray: 'टोल भरा आणि मरा'; समृद्धी महामार्गावरील कामावरुन राज ठाकरेंचा संताप

'टोल भरा आणि मरा'

समृद्धी महामार्गाला फेन्सिंग घातलेली नाही. रस्त्यावर जनावरे येत असतात, तेव्हा त्याला काय करावं. चारशे दिवस झाले रस्ता लोकांसाठी खुला करुन दिला आहे. आतापर्यंत साडेतीनशे लोक मृत्यूमुखी पडलेत. तेथे काम केलं नाही, पण टोलनाका उभा केला आहे. म्हणजे इथे टोल भरा आणि मरा, अशी परिस्थिती असल्याचं राज ठाकरे म्हणालेत.

भाजपने दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायला शिकावं

या लोकांना धडा शिकवावा, घरी बसवा, निवडणुकीच्या तोंडावर अनेक घोषणा देतात. मात्र सत्तेत आल्यानंतर करु-करु करतात. अमित ठाकरे जात असताना त्यावर भाजपने टीका केली. म्हणे रस्ते बांधायला पण शिका आणि टोल उभे करायला पण शिका, मला वाटते भाजपने दुसऱ्याचे आमदार न फोडता पक्ष उभा करायाला शिकलं पाहिजे, असा टोला राज ठाकरे यांनी भाजपला लगावला.

Raj Thackrey
Ajit Pawar: 'मी त्या गाडीत नव्हतोच', शरद पवारांसोबतच्या 'त्या' भेटीत काय घडलं? अजित पवारांनी सांगितलं स्पष्टच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.