Sulochana Latakar Death: "अशी 'आई' होणे नाही..." ; सुलोचनादीदींसाठी राज ठाकरेंची भावुक पोस्ट

Sulochana Latakar Death
Sulochana Latakar Death
Updated on

Sulochana Latakar Death : अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन झाले आहे. आज ४ जून २०२३ रोजी वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. सुलोचना यांचा श्वसनाच्या त्रासामुळे मृत्यू झाला. त्यांनी सुमारे ६५ वर्षे हिंदी ते मराठी चित्रपटात काम केले.

सुलोचना यांनी १९४२ मध्ये तिच्या करिअरला सुरुवात केली होती आणि २००७ मध्ये आलेला 'परीक्षा' हा तिचा शेवटचा चित्रपट होता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांची आई म्हणून लक्षात राहिली आहे.

राज ठाकरे यांची पोस्ट?

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुलोचना लाटकर यांना श्रद्धांजली वाहीली आहे. त्यांनी भावुक पोस्ट केली आहे. राज ठाकरे म्हणाले, सुलोचना दीदींचं निधन झालं. 'दीदी' ही उपाधी चिकटणं जितकं सोपं, तितकी ती पेलवणं अधिक अवघड. ही उपाधी पुढे चिकटली काहींना पण पेलवता आली फक्त लता दीदींना आणि सुलोचना दीदींना. कारण दोघींच्यात असलेला सोज्वळपणा, ठेहराव आणि कामाप्रतीची निष्ठा ह्यामुळे.

Sulochana Latakar Death
Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांपाठोपाठ उपमुख्यमंत्रीही दिल्लीला रवाना; मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट...

हिंदी सिनेमात ६०, ७० आणि ८० च्या दशकाच्या पूर्वार्धापर्यंत 'आई' हे सिनेमातलं महत्वाचं पात्र असायचं. पण 'आई' पण पडद्यावर ज्यांनी जिवंत केलं ते फक्त निरुपमा रॉय आणि सुलोचना दीदींनी. बाकीची आईची पात्रं ही एकतर बालिश केली गेली आणि त्यांच्यात नकारात्मक छटा आणल्या गेल्या.

सुलोचना दिदींच्यात 'आईपण' हे अंगभूत होतं त्यामुळे त्यांना पडद्यावर भूमिका वठवताना विशेष अभिनय करावा लागलाच नाही. त्यामुळे त्यांच्या आईच्या भूमिका आयुष्यभर लक्षात राहिल्या. पण हिंदीत जितकं वैविध्य नाही मिळालं तितकं वैविध्य त्यांना मराठी सिनेमांत मिळालं, हे मराठी सिनेमाचं भाग्य.

एखादी भूमिका प्रेक्षकाला इतकी विश्वासार्ह वाटावी असा योग दुर्मिळ असतो जो सुलोचना दीदींच्या वाट्याला आला होता. अशी 'आई' होणे नाही, अशी 'दीदी' होणे नाही, अशी पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे.

Sulochana Latakar Death
Sulochana Latakar Death : सुलोचनादिदींनी अमिताभ बच्चनला पाठवलेलं ते पत्र, अख्ख्या महाराष्ट्राला भावूक करणारं दोघांचं नातं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.