मनसेचे पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भूमिकेवर उघड उघड नाराजी व्यक्त केली होती. राज ठाकरे यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने त्यांना शहराध्यक्षपदावरून बाजूला करण्यात आलं आहे. दरम्यान, यानंतर वसंत मोरेंना अनेक मोठ्या पक्षांकडून ऑफर येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र वसंत मोरे यांनी राज ठाकरेंना भेटल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आज अखेर राज ठाकरे यांनी मोरेंच्या मेसेजला रिप्लाय असून भेटीसाठी उद्या मुंबईला या, असा रिप्लाय राज ठाकरे यांनी पाठवला आहे.
मनसेचे नेते वसंत मोरे यांना अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेटीसाठी वेळ दिली आहे. उद्या, सोमवारी सकाळी 11 वाजता वसंत मोरे हे राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राज ठाकरे यांच्या मुबंईतील शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट होणार आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून वसंत मोरे नाराज आहेत. पुण्यातील मनसेचा कुठलाही पदाधिकारी भेटीवेळी सोबत असणार नाही. वसंत मोरे एकटेच मुबंईमध्ये राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. लोकप्रतिनिधी म्हणून अजूनही आपल्या भूमिकेवर वसंत मोरे ठाम असून त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे मनसेच वसंत मोरे यांच्याकडील असलेलं पुणे शहराध्यक्ष पद काढून साईनाथ बाबर यांना मनसेने शहराध्यक्ष पद दिलं आहे.
या सर्व घडामोडी नंतर वसंत मोरे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शिवसेनेच्या काही नेत्यांनी फोन केला. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपर्क साधल्याच मोरे सांगत आहेत. मात्र आपण मनसेतच राहणार आपण मनसैनिक आहोत असं मोरे यांनी स्पष्ट केलंय. आता या सगळ्या घडामोडीनंतर वसंत मोरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर काय निर्णय घेतात, या दोघांमध्ये काय चर्चा होते हे पाहव लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.