Raj Thackeray: "कॅरम इतका चुकीचा फुटलाय की, कुठल्या सोंगट्या..."; राज्याच्या स्थितीवर राज ठाकरेंचं भाष्य

राज्यातील राजकीय घडामोडींवर राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.
Raj Thackeray
Raj Thackerayesakal
Updated on

मुंबई : राज्याच्या राजकीय स्थितीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य करताना त्याला कॅरमच्या खेळाची उपमा दिली आहे. तसेच नेमका कोणी कोणाचा काटा काढला? हेच कळत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पुण्यात माध्यमांशी बोलताना आपण लवकरच मेळावा घेणार आहोत, यामध्ये आपली सविस्तर भूमिका मांडू असं म्हटलं आहे. (Raj Thackeray gives metaphor to Politics of Maharashtra like game of Carom)

Raj Thackeray
Shambhuraj Desai: अजितदादांच्या एन्ट्रीमुळं खेळ बिघडणार? शंभुराज देसाईंचं ठाकरेंबाबत मोठं विधान

राज ठाकरे म्हणाले, कॅरम इतका चुकीचा फुटला आहे की, कुणाच्या सोंगट्या कोणाच्या बाजुला आहेत हेच कळत नाहीए. म्हणजेच मनसेचे लोक कोण आहेत हेच फक्त सांगता येतं पण इतर नेते कोण कुठल्या पक्षात आहेत, हे सांगताच येत नाही. हे दुर्देव आहे महाराष्ट्राचं.

Raj Thackeray
Sushma Andhare: राज, उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं का? सुषमा अंधारेंनी स्पष्टच सांगितलं

दरम्यान, एका मुलाखतीत राज ठाकरे म्हणाले होते की अजित पवारांनी काकांकडे जरा लक्ष द्यायला हवं. पण आता काकांचं चुकलं कुठं लक्ष द्यायला? याची पत्रकारांनी आठवण करुन दिल्यानंतर राज ठाकरे म्हणाले, "आता कोण कुठं चुकलंय माहिती नाही. घडाळ्यानं काटा काढला की काट्यानं घड्याळ काढलं, माहिती नाही मला"

Raj Thackeray
Jitendra Awhad: आव्हाडांचा खळबळजनक दावा! शिंदेंच्या बंडांनंतर २४ तासांत पत्र तयार होतं पण...

विरोधीपक्ष नेते अजित पवार यांचा गट थेट सरकारमध्ये सामिल झाल्यानं राज्यासह देशाच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. ई़डी-सीबीआयच्या कारवाईमुळं राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते भाजपसोबत गेल्याचा आरोपही केला जात आहे. पण आपण PM मोदींच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासासाठी भाजपसोबत गेलो असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.