मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल मशिदींवरील भोंगे काढा नाहीतर आम्ही भोंग्यांविरोधात दुप्पट लाउडस्पीकर लावून हनुमान चालिसा वाचू असा इशारा दिला होता. दरम्यान, आज दुपारी घाटकोपर येथे मशिदी समोर भोंग्यावर (स्पिकरवर) हनुमान चालीसा वाजवण्यास सुरुवात झाली आहे. या घटनेमुळे घाटकोपर परिसरात मनसे आक्रमक झाले असल्याची माहिती समोर येत आहे. (hanuman chalisa on speaker start in ghatkopar)
काल मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यानिमित्त राज ठाकरे शिवतीर्थावर बोलत होते. यावेळी त्यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत इशारा दिला होता. मी आधीही बोललो होतो. परंतु, ते अद्यापही सुरूच आहे. प्रार्थनेला विरोध नाही. मात्र, भोंगे काढावे लागतील. सरकारला हा निर्णय घ्यावाच लागले. अन्यथा आम्ही भोंग्यांविरोधात दुप्पट लाउडस्पीकर लावून हनुमान चालिसा वाचू असे राज ठाकरे (Raj thackeray) म्हणाले होते. दरम्यान, राज ठाकरे यांनी काल दिलेल्या याविषयी अल्टिमेटम दिला होता. लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे आज भोंग्यावर हनुमान चालीसा वाजवण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान, मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. याला अनेकदा विरोध झाला आहे. पहाटे पाच वजतापासून भोंगे वाजत असल्याने झोप होत नाही. परीक्षेच्या काळात मुलांचा अभ्यास होत नाही. असे अनेक कारणं पुढे करून भोंग्यापासून सुटका मिळावी अशी मागणी होत असल्याचा मुद्दाही त्यांनी काल उपस्थित केला होता. आता मनसेच्या या आक्रमक भूमिकेमुळे पुन्हा एकदा मनसे विरुद्ध महाविकास आघाडीतील वाद समोर येणार का? असा चर्चांनी वेग घेतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.