Raj Thackeray: राज्यपालांना कोणी स्क्रिप्ट देतय का? राज यांचा रोख कोणाकडे...

Raj Thackeray and Bhagasinh koshyari and devendra fadnavis
Raj Thackeray and Bhagasinh koshyari and devendra fadnavis
Updated on

कोल्हापूर - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यभरातील राजकारण ढवळून निघालं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यपालांच्या विधानावरून भाजपवर टीका केली होती. तसेच शिवाजी महाराजांची प्रतिमा खराब करण्यासाठी नियोजित कट करण्यात येत असल्याचा आरोप उद्धव यांनी केला होता. त्यातच आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील राज्यपालांच्या विधानावर गंभीर शंका उपस्थित केली आहे. (Raj Thackeray news in Marathi)

Raj Thackeray and Bhagasinh koshyari and devendra fadnavis
Gautam Adani : मार्केटची दिशा बदलणार?; 'या' व्यवसायातही खणखणणार अदानींचं नाणं

राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केलं. त्यानंतर शिंदे-फडणीसांसोबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जवळीक वाढली होती. अनेक कार्यक्रमांमध्ये राज ठाकरे आणि शिंदे-फडणवीस एकत्र हजेरी लावताना दिसले होते. त्यामुळे मनसे-भाजप-शिंदे गट मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढवणार अशा चर्चा सुरू होत्या. मात्र राज ठाकरे यांनी आज मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्र लढविण्याची घोषणा केली. त्यामुळे मनसे-भाजप युती फिसकटली हे स्पष्ट झालं. शिवाय राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला टोले लगावले आहे.

Raj Thackeray and Bhagasinh koshyari and devendra fadnavis
आज दिवसभरात नेमकं काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

राज ठाकरे कोकण दौऱ्यावर असून त्याआधी त्यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेतील. यावेळी ते म्हणाले की, सीमावादाचा प्रश्न मध्येच कसा वरती येतो हे कळलं नाही. असं मध्येच सीमावादाचा प्रश्न वरती येणं म्हणजे आपलं लक्ष दुसरीकडे वळवायचं. हे कुठून येतं. तुमचं संपूर्ण लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असं दिसून येत असही राज ठाकरे म्हणाले. कर्नाटकमध्ये भाजपचं सरकार असून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनीच सीमावादाचा मुद्दा उकरून काढला होता. त्यामुळे राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्य लक्ष विचलीत करण्याच्या मुद्दावरून भाजपला टोला लागवला आहे.

यावेळी राज ठाकरे यांनी राज्यपालांच्या विधानावर परखड मत व्यक्त केलं. राज्यपालांनाही दुसरं कोणी स्क्रीप्ट देतयं का, अशी शंका उपस्थित करत राज यांनी भाजपला टोला लगावला. यावेळी राज ठाकरे यांनी माध्यमांच्या वार्तांकनावरही प्रश्नचिन्ह निर्माण केले. तसेच वादग्रस्त बोलणाऱ्यांना टेलिव्हिजनवर वाव देऊ नका, असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं.

हेही वाचा - दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.