Raj Thackeray: राज ठाकरेंना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड, तोडलं स्टीलचं ग्रील

Raj Thackeray Maharashtra Tour: पुढील दोन महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि मराठा आरक्षणावरील त्यांची भूमिका त्यामुळे त्यांचा हा दौरा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
Raj Thackeray Nanded
Raj Thackeray NandedEsakal
Updated on

महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. पुढील दोन महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि मराठा आरक्षणावरील त्यांची भूमिका त्यामुळे त्यांचा हा दौरा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

दरम्यान आज नांदेड आणि हिंगोली दौऱ्यावर असलेले राज ठाकरे यांना भेटण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. अशात हिंगोलीतील शासकीय विश्रामगृहात थांबलेल्या ठाकरेंना भेटण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांची तेथे झुंबड उडाल्याने स्टीलचा ग्रील तुटल्याचे पाहायला मिळाले. हे ग्रील तुटल्यानंतर कार्यकर्ते खाली कोसळले.

सामच्या प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, काही वेळापूर्वीच राज ठाकरे नांदेडहून हिंगोलीमध्ये दाखल झाले होते. तेव्हा ते हिंगोलीतील शासकीय विश्रामगृहात थांबले होते. यावेळी त्यांना भेटण्यासाठी तेथे मनसेचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंवर फुलांची उधळण करण्यासाठी 4 जेसीबी तयार ठेवले होते. इतक्यात तिथे उपस्थित असलेल्या काही कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी सुरू केली. विश्रामगृहाच्या वरांड्यात असलेले स्टीलचे ग्रील टुटून पडले. यानंतर काही कार्यकर्तेही खाली कोसळले.

Raj Thackeray Nanded
Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेतला 'मुख्यमंत्री' शब्द गायब! अजित पवार गटाकडून गाण्याचा Video लाँच, वाद उद्भवण्याची शक्यता

राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा

दरम्यान राज ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याला 4 ऑगस्टपासून सुरूवात झाली होती. त्यांनी याला सोलापूरपासून सुरूवात केली. यानंतर ते बीड, लातूर, नांदेड आणि आता हिंगोलीला पोहचले आहेत.

ठाकरे यांच्या यांचा हा दौरा 14 ऑगस्ट पर्यंत चालणार होता. परंतु, यामध्ये आता बदल करण्यात आले आहेत. त्यांचा हा दौरा आता 11 ऑगस्टलाच संपणार आहे. दरम्यान ते 10 ऑगस्ट रोजी संभाजीनगरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.

Raj Thackeray Nanded
Assembly Elections: भाजपचा सिक्रेट प्लॅन ठरला! ठाकरेंच्या बालेकिल्ल्याना सुरुंग लावण्यासाठी वापरणार 'ही' ट्रिक

धारशिवमध्ये मराठा आंदोलकांकडून नारेबाजी

राज ठाकरे सोलापूरनंतर धाराशिवमध्ये मुक्कामाला होते. त्यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना भेट मागितली होती. तेव्हा ठाकरे यांचे पदाधिकारी आणि मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली होती. त्यानंतर मराठा कार्यकर्त्यांना ठाकरेंविरोधात नारेबाजी केली होती.

दुसरीकडे राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर केलेल्या टिप्पणीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी ठाकरेंवर टीका केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.