मृणालिनी नानिवडेकर ः सकाळ न्यूज नेटवर्कMumbai: यंदाची विधानसभा निवडणूक ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. माहीम मतदारसंघातून मुलगा अमित याला निवडून आणण्यासह पक्षाची मान्यता कायम राखण्याचे आव्हान राज यांच्यापुढे आहे. .Raj Thackeray : राज ठाकरेंनी सभा थांबवून कोणाला सांगितले स्टेजवर बसायला?.त्यासाठी त्यांना एकूण मतदानापैकी सहा टक्के मते मिळवत दोन आमदार किंवा तीन टक्के मते मिळवत तीन आमदार किंवा आठ टक्के मते मिळवावी लागणार आहेत.विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने १२३ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. महाराष्ट्रात नऊ कोटी ७० लाख मतदार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ६१.२९ टक्के, तर मागील तिन्ही विधानसभा निवडणुकीत सरासरी ६० टक्के मतदान झाले होते. मतदानाचा हाच आकडा कायम राहिल्यास सुमारे सहा कोटी मतदान होईल. त्यातील आठ टक्के मते मिळवणे हे मनसेला पक्षाची मान्यता कायम राखण्यासाठी आवश्यक आहे. .Raj Thackeray: एकदा सत्ता माझ्या हातात द्या, मशिदींवरील भोंगे ४८ तासांत उतरवू .आठ टक्के मते म्हणजे जवळपास २५ लाख मते होतात. यापूर्वी मनसेला २०१४च्या विधानसभा निवडणुकीत १६ लाख ६५ हजार मते, तर २०१९ मध्ये १२ लाख ४२ हजार १३५ मते मिळाली होती; परंतु आता आणखी सुमारे १० लाखांच्या मतांची बेगमी करावी लागणार आहे. यंदाच्या निवडणुकीत मनसेच्या १२३ पैकी सुमारे ४५ उमेदवार हे लक्षणीय लढत देत असल्याचे म्हटले जात असले, तरी २५ लाख मते मिळतील का, या प्रश्नाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. .Raj Thackeray : एकमेव आमदाराच्या प्रचाराला राज ठाकरे कल्याणात, वाचा जनतेला काय दिला संदेश.अट सहज पूर्ण करू!विधानसभा निवडणुकीत आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एवढेच नव्हे, तर आमचे किमान चार उमेदवार निवडून येतील. पक्षाची मान्यता कायम ठेवण्यासाठी तीन आमदार आणि तीन टक्के मतांची अट आम्ही सहज पूर्ण करू, असा विश्वास मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केला. मनसेला पुन्हा एकदा जनता जवळ करत असल्याचा विश्वास बाळा नांदगावकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला..Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.