Raj Thackeray : हे निर्णय देशाला परवडणारे नसतात; राज ठाकरे मोदी सरकारवर कडाडले!

raj Thackeray on RBI withdraws Rs 2,000 notes from circulation narendra modi demonetization
raj Thackeray on RBI withdraws Rs 2,000 notes from circulation narendra modi demonetization esakal
Updated on

भारतीय रिझर्व्ह बँकेने २००० रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेतल्याची घोषणा केली आहे. जर कोणाकडे दोन हजार रुपयांची नोट असेल तर त्याची वैधता कायम राहणार आहे. दरम्यान २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटाबंदीच्या घोषणेनंतर दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा बाजारात आल्या होत्या. त्या आता पुन्हा बंद करण्यात आल्या आहेत यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे म्हणाले की, हा धरसोडपणा आहे. तज्ज्ञांना विचारुन या गोष्टी झाल्या असत्या तर ही वेळ आली नसती. कधीही आणायचं कधीही बंद करायचं. जेव्हा या नोटा आणल्या तेव्हा त्या एटीएम मशीनमध्येही जात नव्हत्या. म्हणजे त्या एटीएममध्ये जातात की नाही हे देखील पाहिलं गेलं नव्हतं. हे असले निर्णय देशाला परवडणारे नसतात.

आता परत लोकांनी बँकेमध्ये पैसे टाकायचे, मग परत तुम्ही नवीन नोट आणणार असं काय सरकार चालतं का? असे थोडीना प्रयोग होतात. नोटबंदी या विषयावर मी यापूर्वी देखील बोललो होते. असे राज ठाकरे यावेळी म्हणाले. राज ठाकरे हे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत.

raj Thackeray on RBI withdraws Rs 2,000 notes from circulation narendra modi demonetization
Karnataka CM : सिध्दरामय्या अन् शिवकुमार यांचा आज शपथविधी; खर्गेंच्या लेकासह 'हे' ८ आमदार बनणार मंत्री

त्र्यंबकेश्वर प्रकरणावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

त्र्यंबकेश्वर मंदिरात मुस्लीम नागरिकांनी प्रवेश केल्याच्या प्रकरणावर देखील राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. वर्षानुवर्षे जर तिथली प्रथा असेल तर ती थांबवण्यात काही अर्थ नाही, महाराष्ट्रामध्ये अनेक अशी मंदिरे आणि मशिदी आहेत, त्याठिकाणी हिंदू-मुस्लीम एकोप्याने राहतात.

माहिम मधील उरूसाला माहिम पोलिस स्टेशनचा कॉन्स्टेबल चादर चढवतो, जर इतर धर्माचा माणूस मंदिरात आला तर इतका भ्रष्ट होणारा कमकुवत धर्म आहे का? अशा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. तर पुढं बोलताना म्हणाले, मी देखील अनेक दर्ग्यात गेलो असल्याचे त्यांनी सांगितले तर त्र्यंबकेश्वर मंदिराचा निर्णय गावकऱ्यांनी घ्यायचा आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

raj Thackeray on RBI withdraws Rs 2,000 notes from circulation narendra modi demonetization
Nawazuddin Siddiqui Birthday: आज तिला पाच सहा मुलं आहेत.. नवाझने सांगितली पहिल्या प्रेमाची गमतीशीर आठवण..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()