Raj Thackeray: महाराष्ट्र कशासाठी जगवलात? राज ठाकरे जेव्हा शिवरायांना फोन कॉल करतात

Raj Thackeray
Raj Thackeray
Updated on

Raj Thackeray :   अवधूत गुप्ते यांचा लोकप्रिय कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या कार्यक्रमाबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता होती. या कार्यक्रमाचे तिसरे पर्व सुरू झाले आहे. तिसऱ्या भागातील कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक विषयावर दिलखुलास गप्पा मारल्या आहेत.

यावेळी राज ठाकरे यांच्यासाठी एक टास्क होता. राज ठाकरे यांनी अस्तित्वात असलेल्या किंवा नलसेल्या व्यक्तिंना फोन कॉल करायचा होता. यावेळी राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना फोन कॉल केला.

राज ठाकरे म्हणाले, मी मनातून बोलत आहे. मला संधी दिली म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराजांना फोन कॉल करणार आहे. माझी इच्छा आहे शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात पुन्हा अवताराव, देशात अवतारावर. खास करुन महाराष्ट्रात अवताराव आणि महाराष्ट्रातील प्रत्येत माणसाला सांगवा तुम्ही कशासाठी झगळलात.

तुमच्या आयुष्यातील इतकी वर्ष तुम्ही कशासाठी घालवलीत. काय समजवण्यात घालवली, काय करण्यात घालवलीत. औरंगजेब सारखा बादशाह तुमचे विचार मारण्यासासाठी २७ वर्ष महाराष्ट्रात राहीला आणि मेला पण आम्हाला आजही कळत नाही, तुम्ही कोण आहात?, का आहात ? महाराष्ट्र कशासाठी जगवलात?, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

Raj Thackeray
Yogi Adityanath : योगी सरकारने अतिकच्या जमिनीवर उभारली इमारत; गोरगरिबांना केवळ साडेतीन लाखांत मिळणार फ्लॅट

आजही आम्हाला समजत नाही आम्ही फक्त तुमच्या जयंती आणि पुण्यतिथी साजरी करतो. तुम्ही कोण आहात आम्हाला समजले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती बघता आम्ही तुम्हाला हरवलं आहे. तुम्ही आम्हाला समजत नाही आहात, तुम्ही आम्हाला कळत नाही आहात. त्यामुळे महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे. माझी विनंती आहे महाराज पुन्हा एकदा या, असे राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray
Devendra Fadnavis : गुजरात-कर्नाटक नव्हे तर परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्रच नंबर एकवर; फडणवीसांचा मोठा दावा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.