Raj Thackeray On Zirwal : 'तुम्ही सत्ताधारी, संविधानिक पदावर बसलेले, तुम्ही निषेध कसले नोंदवताय?'; झिरवाळांच्या आंदोलनावर राज ठाकरे संतापले

Raj Thackeray On Narhari Zirwal Jump : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून अगदी कठोर शब्दत नरहरी झिरवळ आणि इतर आमदारांच्या आंदोलनावर टीका केली आहे.
Raj Thackeray
Raj Thackeray
Updated on

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापण्यासा सुरूवात झाली आहे. यादरम्यान आरक्षणाचा मुद्दा देखील सातत्याने चर्चेत आहे. यादरम्या धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश न करण्याबाबत आज विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह दोन आदिवासी आमदारांनी मंत्रालयात लावण्यात आलेल्या जाळीवर उड्या घेतल्या. या प्रकारानंतर मंत्रालय परिसरात एकच खळबळ उडाल्याचे पाहायाला मिळाले. दरम्यान या प्रकारानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भाष्य केले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून अगदी कठोर शब्दत नरहरी झिरवळ आणि इतर आमदारांच्या आंदोलनावर टीका केली आहे. आदीवासी समाजावर होणाऱ्या आन्यायाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या मारणे हा कुठला निषेध? असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे.

Raj Thackeray
Narhari Zirwal: नरहरी झिरवळांसह आदिवासी आमदारांनी मंत्रालयातून मारल्या उड्या; भयंकर प्रकाराने मंत्रालय हादरले

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

"सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष श्री. नरहरी झिरवळ यांनी आणि इतर दोन आमदारांनी , आदिवासी समाजवर होणाऱ्या अन्यायाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मंत्रालयात संरक्षक जाळीवर उड्या मारून, म्हणे यांनी निषेध नोंदवला. हा कुठला निषेध? सत्तेशिवाय राहू शकत नाही, असं म्हणणं शक्य नव्हतं, म्हणून 'जनतेच्या सेवेला सत्ता हवी', म्हणत तुम्हीच आणि तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्यात ना?

सत्ता आली तरी तुम्ही स्वतःचं सोडून कोणाचंही भलं करू शकत नाही हे नक्की. बरं मुळात तुम्ही सत्ताधारी, त्यात पुन्हा संविधानिक पदावर बसलेले, तुम्ही निषेध कसले नोंदवताय? आदिवासी जनतेबद्दल खरंच कळवळा असेल तर, आजपर्यंतच्या सर्व सत्ताधाऱ्यांनी, ज्यांनी आदिवासी हे मागासच राहतील हे पाहिलं त्या सगळ्यांनी संरक्षक जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारून प्रायश्चित्त घेतलं पाहिजे.

महाराष्ट्राच्या राजकारणाची सर्कस करून ठेवली आहे. त्या सर्कसीत तोफेच्या आत जाऊन नंतर तिकडून बाहेर जाळ्यात फेकला जाणारा माणूस आठवतोय? तसं या सगळ्यांचं झालं आहे, आता जनतेच्या तोफेच्या तोंडी जायची वेळ आली आहे, मग आपणच स्वतः जाळ्यावर उड्या मारा. माझी महाराष्ट्राच्या जनतेला विनंती आहे की यांना तोफेच्या तोंडी जाणं म्हणजे नक्की काय असतं हे या निवडणुकीत दाखवूनच द्या. तुम्हाला गृहीत धरायचं, तुमच्या पिढ्याच्या पिढ्या बरबाद करायच्या आणि नंतर स्वतः पोरकट चाळे करायचे, या सगळ्याला झटका देण्याची, ही विकृत झालेली व्यवस्था उलथवून टाकण्याची संधी आजपासून काही आठवड्यात तुम्हाला येणार आहे. आणि या वेळेस जर तुम्ही योग्य पाऊल उचललं नाहीत तर मात्र हे लोकं परिस्थिती अधिक विदारक करतील आणि संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट करतील. तेंव्हा वेळ जायच्या आत जागे व्हा!" असे राज ठाकरे त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

Raj Thackeray
Cabinet Meeting : आता ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान करणे पडणार महागात! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

नेमकं काय झालं?

धनगर समाजाला आदिवासींमधून आरक्षण देण्यास विरोध करण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्र्यांची भेट मिळावी अशी त्यांची मागणी होती. पण ती मिळू शकली नाही. यानंतर झिरवाळ यांच्यासह आमदार राजेश पाटील, आमदार सुनील भुसारा, भाजप खासदार हेमंत सावरा यांनी मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उड्या घेतल्या. याप्रकारामुळे मंत्रालयातील सुरक्षा यंत्रणेची एकच धावपळ उडाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.