लवकरच राज्यातील सर्व मनसे शाखा, कार्यालयं आणि शासकीय कार्यालयांनाही मी एक भेट वस्तू पाठवणार
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या आहेत. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष टोकाल गेल्याचे पहायला मिळत आहे. राज्यात प्रत्येक पक्षप्रमुख पक्षवाढीसाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या एका कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात उपस्थिती लावली. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे सर्व शाखा, कार्यालये, शासकीय कार्यालयांना भेटवस्तू पाठवली जाणार असून ही भेटवस्तू म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेल्या संदेशाच्या दोन ओळी असणार आहेत आण या दोन ओळींची पाटी प्रत्येक कार्यालयात लावली जावी असं राज ठाकरे यांनी सूचना सर्व कार्यकर्त्यांना केल्या आहेत. अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील कांदिवली येथे पक्ष कार्यालयाचं उदघाटन करण्यात आलं.
यावेळी ते म्हणाले, आपल्या शाखेच्या उदघाटनाला म्हणून मी आलो. मी भाषण करायला व्यासपीठावर आलो नाही. कारमधून जाताना तुमचं दर्शन होत नाही. त्यामुळे केवळ तुमर्च दर्शन घेण्यासाठी व्यासपीठावर आलो. लवकरच राज्यातील सर्व मनसे शाखा, कार्यालयं आणि शासकीय कार्यालयांनाही मी एक भेट वस्तू पाठवणार आहे. ती भेटवस्तू म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रामधील दोन ओळी असणार आहेत. प्रत्येक शाखा आणि कार्यालयाच्या भिंतीवर या दोन ओळींची पाटील लागली गेली पाहिजे", असं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.
काय आहेत त्या दोन ओळी
'कारभार ऐसे करावा की रयतेच्या भाजीच्या देठासही हात न लावणे', या छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका पत्रातील दोन ओळी प्रत्येक कार्यालयाच्या भींतीवर असल्या पाहिजेत असं राज ठाकरे म्हणाले. प्रत्येक शाखेच्या भींतीवर शिवरायांच्या या दोन ओळी लागल्या गेल्या पाहिजेत. कारण ती शाखा आहे दुकान नव्हे. तिथं येणाऱ्या प्रत्येकाच्या अडचणी सोडवल्या गेल्या पाहिजेत. कसं वागावं याचं जे शिवरायांनी अनेक संदेशातून सांगितलं आहे. त्यातील या दोन ओळी खूप महत्वाच्या आहेत. माझ्या पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना लोकांना त्रास देऊ शाखा चालवायच्या नाहीत, असं राज ठाकरे म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.