पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे दोन दिवसांसाठी पुण्याच्या दौऱ्यावर आले आहेत. मंगळवारी (ता. १७) ते पुस्तके खरेदी करण्यासाठी गेले होते. बाजीराव रस्त्यावरील पुस्तकाच्या दुकानात जात असताना राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यासाठी माध्यमांचे प्रतिनिधी जवळ जात होते. यावेळी ते संतापले (angry) आणि ‘जगू द्याल का?’ असा प्रश्न विचारला. तसेच त्यांनी कॅमेरे बंद करायला लावले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Raj Thackeray was angry with the media representatives)
राज ठाकरे (Raj Thackeray) हे मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारात पुस्तक खरेदी करण्यासाठी गेले होते. राज ठाकरे येणार असल्याचे समजल्याने प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी बोलण्यासाठी गर्दी केली होती. गाडीतून उतरल्यानंतर राज ठाकरे ‘ये लाइट बंद करा रे, जगू द्याल का?’ असे म्हणत राग (angry) व्यक्त केला.
राज ठाकरे हे नेहमीच नवीन पुस्तके खरेदी करतात. अक्षरधारा हा त्यांचा नेहमीचा ठिय्या आहे. अयोध्या दौऱ्याच्या घोषणेनंतर ते सध्या चर्चेत आहेत. ते पुण्यात (pune) आल्यानंतर पुण्यातील माध्यमांनी त्यांचा पाठलाग दिवसभर केला. अयोध्या दौऱ्यापूर्वी राज ठाकरे यांची सभा होणार आहे. राज यांच्या सभेसाठी मनसेकडून पुणे पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज करण्यात आला होता.
राज ठाकरे (Raj Thackeray) हे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत. आम्ही २१ ते २७ मे दरम्यान पुण्यात सभेचे आयोजन करीत आहोत. ही सभा नेमकी कुठे होणार? त्याबाबत राज ठाकरे उद्या जाहीर करणार आहेत, असे त्यांच्या दौऱ्याबद्दल माहिती देताना मनसे नेते बाबू वागसकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.