मुंबई : भोंगा प्रकरणावरुन अद्यापही राज्यातील राजकारण शांत झालेलं नाही. हा मुद्दा उकरुन काढणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर यावरुन आता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सडकून टीका केली आहे. राज ठाकरे रंगबदलू आहेत ते वारंवार आपल्या पक्षाच्या झेंड्याचा रंगही बदलत असतात, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. (Raj Thackeray who frequently changes the color of party flag he is rangbadlu says Vijay Wadettiwar)
वडेट्टीवार म्हणाले, "प्रत्येक मंदिरावर आणि मशिदीवर पहिल्यापासूनच लाऊडस्पीकर लावलेले आहेत. माझ्या चिमूर आणि ब्रह्मपुरीत मी मंदिरं-मशिदींवर लावण्यासाठी दहा वर्षांपूर्वीच मी ५०० लाऊडस्पिकर दिले होते. याचा धर्माशी काय संबंध, पण हे म्हणतात आम्ही भोंगा बंद करू, पण यांचा चोंगाच फाटलाय आणि हे भोंगे बंद करण्याची भाषा करताहेत रंगबदलू. हे वारंवार आपल्या झेंड्याचा रंग बदलत आहेत"
कधी राज ठाकरे बोलतात तर कधी कोण बोलतं की आम्ही राम मंदिराकडे जाणार आहोत. जा ना तुम्ही तुम्हाला कोणी अडवलंय. पण असे लोक समाजात फूट पाडायचं काम करतात. हिंदुस्तानाला त्रास देण्याचं काम करत आहेत यांचा बंदोबस्त करायला हवा, असही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.