मुंबई : राज्यात आज तिथीनुसार शिवजयंती (Shiv Jayanti) मोठ्या उत्साहात साजरी केली जात असून, शिवाजी पार्क येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडून उपस्थित मनसे कार्यकर्त्यांना शपथ देण्यात आली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीबाबत शिवसेनेच्या बदलेल्या भूमिकेवर भाष्य करत टीका केली आहे. (Sharmila Thackeray Criticize Shivsena)
शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) म्हणाल्या की, गेल्या चार ते पाच वर्षांपासून मनसेकडूनच (MNS) तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी केली जात आहे. परंतु, शिवसेना (ShivSena) जेव्हापासून सत्तेत गेली आहे तेव्हापासून त्यांना बहुदा तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीचे कदाचित विस्मरण झाले असावे, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या. मात्र, आम्ही सत्तेत असू अथवा नसू आम्ही तिथीनुसारच शिवजयंती साजरी करत राहणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे यांनी पुणे येथे वर्धापनदिनाला सांगितले होते की, छत्रपतींचा दिवस हा रोज साजरा केला तरी कमी पडेल, त्यांचे विचार, आचार दररोज लोकांना बिंबवले पाहिजे. आज राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शपथ दिल्याचे सांगत शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, गेल्या दोन वर्षांपासून शिवजयंती साजरी करणे शक्य झाले नव्हते असे सांगत पक्षातर्फे दरवर्षी तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी केली जाते यावेळी कोरोनाचे संकट काही प्रमाणात कमी झाल्याने लाखो लोक उत्साहाने शिवजयंती साजरी करण्यासाठी एकत्र जमले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे स्वराज्य स्थापन केले होते तसेच स्वराज्य महाराष्ट्रातदेखील स्थापन व्हाव हीच राज ठाकरे यांची इच्छा आहे त्यामुळे आज कार्यकर्त्यांना आपल्या भाषेत शपथ दिल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.