मुंबई : निवडणूक लढविण्यावर (election) पक्षश्रेष्ठी ठाम असल्याचे सांगून राज्यसभा (State council) पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देऊन निवडणूक लढविण्याचा पवित्रा घेतलेल्या भारतीय जनता पक्षाने (BJP) सोमवारी अखेर माघार घेतली आणि काँग्रेसच्या उमेदवार रजनी पाटील (Rajani patil) या बिनविरोध राज्यसभेच्या सदस्या झाल्या. ‘माझ्यावरील जबाबदारी (responsibilities) नेटाने पार पाडण्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. प्रतिक्रिया पाटील यांनी दिली; तर सदस्याच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक नको, म्हणून अर्ज मागे घेतल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले.
निवडणूक अधिकाऱ्यांना पाटील यांना निवडीचे पत्र दिले. काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या पाटील आणि भाजपच्या संजय उपाध्याय यांनी अर्ज दाखले केले होते. या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार न देण्याचा आग्रह काँग्रेसचा होता; तरीही 'पक्षातील वरिष्ठांचा निवडणूक लढण्याची आग्रह असल्याचे माघार नाही, असे भाजप नेत्यांनी गेल्या आठवड्यात स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतरही 'प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि कोअर कमिटीतील सदस्य निर्णय घेतील,' असे फडणवीस यांनी सांगितले होते. त्यामुळे निवडणूक होणार का, याबाबत उत्सुकता होती.
निवडणुकीतून अर्ज मागे घेण्याच्या दिवशी म्हणजे, सोमवार निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर उपाध्याय यांनी अर्ज मागे घेतला. उपाध्याय म्हणाले, "पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार अर्ज दाखल केला होता. मात्र, काँग्रेसचे नेते दोन वेळा वरिष्ठांना भेटले. सर्व पातळ्यांवर चर्चा करूनच माघार घेतली आहे. अर्ज दाखल करण्याआधी आमची भूमिका वेगळी होती."
महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमधील सध्याचा राजकीय संघर्ष पाहता ही निवडणूक होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र, परंपरा म्हणून पटोले, थोरात, फडणवीस यांना भेटले; तर अन्य नेत्यांशी त्यांची चर्चा केली. त्यानंतर दोन-तीन दिवसांत भाजपने अपेक्षित सहकार्य केल्याने काँग्रेस नेत्यांचे त्यांचे आभार मानले आहे. अडचणीच्या काळात अशा प्रकारचे सहकार्य राहील, असे पटोले यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.