Eknath Shinde : ''बाळासाहेबांच्या विचारांसाठी सत्ता परिवर्तन करणारे शिंदे खरे राष्ट्रभक्त'', राजगुरु परमहंस आचार्यांची शंकराचार्यांवर टीका

Swami Avimukateshwaranand : अयोध्येतील छावणी पिठाधीश्वर राजगुरू परमहंस आचार्य यांनी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेले वक्तव्य पक्षपातीपणाचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना असे वक्तव्य करण्यासाठी मोठी दक्षिणा मिळाली असावी त्यामुळेच त्यांनी अशी पक्षपाती भूमिका जाहीर केली असेल, असा अरोप राजगुरू परमहंस आचार्य यांनी केला
Eknath Shinde
Eknath Shindeesakal
Updated on

Uddhav Thackeray News : ''बाळासाहेब ठाकरे यांचे विचार टिकवण्यासाठी सत्ता परिवर्तन करणारे एकनाथ शिंदे हेच खरे राष्ट्रभक्त आहेत, सत्तेच्या लालसेपोटी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडून उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेले असून शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भूमिका पक्षपातीपणाची आहे.'' असा घणाघात राजगुरु परमहंस यांनी केला.

अयोध्येतील छावणी पिठाधीश्वर राजगुरू परमहंस आचार्य यांनी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेले वक्तव्य पक्षपातीपणाचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना असे वक्तव्य करण्यासाठी मोठी दक्षिणा मिळाली असावी त्यामुळेच त्यांनी अशी पक्षपाती भूमिका जाहीर केली असेल, असा अरोप राजगुरू परमहंस आचार्य यांनी केला.

Eknath Shinde
Pooja Khedkar : पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात पूजा खेडकरची तक्रार; छळ झाल्याचा आरोप अन्...

आचार्य पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सिद्धांतावर चालणारे नेते आहेत. तर उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या लालसेपोटी बाळासाहेब ठाकरे यांच्या सिद्धांतांची साथ सोडून काँग्रेस सोबत अभद्र युती केली. 'काँग्रेससोबत युती करायची वेळ आली तर मी माझे दुकान बंद करून टाकीन' असे म्हणणारे स्वर्गीय बाळासाहेब यांच्या विचारांना आपल्या कृतीतून उद्धव यांनी तिलांजली दिली आहे, अशी टीका त्यांनी केला.

''तर दुसरीकडे शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार टिकावेत यासाठी प्रसंगी सत्ता परिवर्तन करून राष्ट्रधर्माचे पालन केले आहे, त्यामुळे तेच खरे राष्ट्रभक्त आहेत.'' असे मत जगद्गुरू परमहंस महाराज यांनी व्यक्त केले आहे.

Eknath Shinde
Ajit Pawar : अजित पवारांना बालेकिल्ल्यात धक्का! पिंपरी चिंचवडच्या 'या' नेत्याने सोडली साथ; शरद पवार गटात प्रवेश होणार?

काय म्हणाले होते शंकराचार्य?

‘‘आम्ही सगळे सनातन धर्म पाळणारे लोक आहोत. पाप-पुण्य मानणारे लोक आहोत. सर्वांत मोठा घात गौ-घात सांगितला गेला आहे. मात्र त्यापेक्षाही मोठा घात विश्वासघात आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी हा विश्वासघात झाला आहे. हिंदू धर्मात विश्वासघात हे पाप आहे. विश्वासघात करणारा हिंदू असू शकत नाही. विश्वासघात सहन करणारा हिंदू होऊ शकतो,’’ असे ते म्हणाले. ‘आम्हाला राजकारणाशी घेणे-देणे नाही. जे सत्य आहे, ते आम्ही बोलतो. पाप-पुण्याबद्दल राजकारणी थोडेच बोलणार, त्याबद्दल तर धर्माचार्यच बोलणार ना?’ असा प्रतिसवाल अविमुक्तेश्वरानंद यांनी केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.