Rajmata Jijau Jayanti : मुलगीच हवी! जिजाऊंच्या जन्मासाठी लखुजीराजे जाधवांनी केला होता नवस..

लखुजीराजांना चार पुत्र होते. तरीही लखुजीराजे मात्र सदैव दुःखी असत.
Rajmata Jijau Jayanti
Rajmata Jijau Jayanti esakal
Updated on

२१ वे शतक सुरू आहे. आजही पुर्वापार चालत आलेल्या वंश परंपरा टिकून आहेत. वंश परंपरा पुढे चालावी यासाठी मुलींचे जीव घेण्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. पण, असे नकारात्मक चित्र असताना पंधराव्या शतकात एका कुटुंबात चार मुले जन्माला आल्यावर मुलगी व्हावी यासाठी देवीला नवस बोलण्यात आला होता.

Rajmata Jijau Jayanti
Rajmata Jijau Jayanti : शिवबाच नाही तर, स्वतःला घडवण्यासाठी आजच्या तरुणींनी घ्यावा जिजाऊंचा आदर्श

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रतापवीर संभाजी महाराज या दोन छत्रपतींना घडवणा-या जिजाऊ आदर्श राजमाता होत्या. जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा गावी झाला. आज त्यांची जयंती. जिजाऊ जन्माव्यात यासाठी त्यांच्या आई वडिलांनी देवीला साकडे घातले होते. जाणून घेऊयात काय होता तो किस्सा.

Rajmata Jijau Jayanti
RRR Sequel: ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या 'RRR'चा येणार सिक्वल; राजामौलींची घोषणा

राजमाता जिजाऊंच्या वडिलांचे नाव लखुजीराव आणि आईचे नाव म्हाळसाबाई जाधव असे होते. प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे एका स्त्रीचे पाठबळ असते, असे म्हणतात. हे अगदी खरे आहे. याची प्रचिती जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहुन येते. शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला. स्वराज्य स्थापन केले. रयतेसाठी आयुष्य वेचले. त्याचे बाळकडू त्यांना माता जिजाऊंकडून मिळाले. शिवाजी महाराजांची प्रत्येक मोहिम, शत्रुवर केलेला वार वाया नाही गेला. कारण, त्याला जोड होती जिजाऊंच्या आशिर्वादाची आणि धैर्याची.   

Rajmata Jijau Jayanti
Rajmata Jijau Jayanti : राजमाता जिजाऊंचा थोडक्यात जिवनप्रवास..

जिजाऊंच्या जन्माची कथा म्हणजे दैवी चमत्कारच म्हणावा लागेल. कारण, लखुजीराजांना चार पुत्र होते. तरीही लखुजीराजे मात्र सदैव दुःखी असत. कारण त्यांना कन्यारत्नाची हाव होती. आपलेही अंगण मुलीच्या पैजणांच्या आवाजाने दुमदुमून उठावे असे त्यांना नेहमी वाटे. पण, देवाने त्यांना चार पुत्र दिले.

जशी लखुजीराजेंची अवस्था होती. तशीच म्हाळसा राणीसाहेबांची देखील होती. पदरात चार पुत्र असतानाही लेकीची ओढ त्यांना अधिक होती. म्हाळसाबाई या वृत्तीने अतिशय धार्मिक होत्या. कन्यारत्नाच्या प्राप्तीसाठी म्हाळसा राणीसरकारांनी अनेक व्रतवैकल्ये केली होती. या दोघांनी रेणूकामातेला नवस बोलले होते.

एक दिवस रेणुका देवी नवसाला पावली. सिंदखेडच्या राजवाड्यात म्हाळसा राणीसाहेब यांच्या पोटी 12 जानेवारी 1598 रोजी जिजाऊंचा जन्म झाला. जन्माला आलेली कन्या अतिशय सुंदर, रेखीव होती. गोरीपान, नाजूक कळीच जशी! सुंदर काळा केशसंभार, विशाल भाल,सरळ चाफेकळी नाशिका, काळेभोर टपोरे मृगनयन, गुलाबकळी सारखे लालचुटुक ओठ, गुलाबी गाल, नाजुक जिवणी,लांबसडक बोटे.खरोखरच दृष्ट लागावी अशीच मूर्ती होती ती.

Rajmata Jijau Jayanti
Rajmata Jijau Jayanti : राजमाता जिजाऊंच्या बालपणाची साक्ष असलेला भुईकोटचा वाडा

त्या कन्येचे तेजस्वी रूप पाहुन साक्षात मूर्त जगदंबाच कन्येचे रूप घेऊन सिंदखेड राज्यात आवतरल्याचे भास झाले. जन्मानंतर मुळे गुरूजींनी जिजाऊंची कुंडली बनवली. त्यामध्ये त्यांच्या पोटी साक्षात शिवशंकर अवतार घेतील. फार भाग्यवान आहे ही लेक, असे मुळे गुरुजीनी सांगितले.

जिजाऊंचे नाव ‘ज’ वरून ठेवावे असे गुरूजींनी सुचवले. जी नेहमी जय मिळवते ती जिजा! कन्येचे जिजाऊ नाव ठेवले. लखुजीराजे यांनी अत्यंत उत्साहात बारशाचा थाट केला. त्या दिवशी नगरवासियांनी दीपोत्सव साजरा केला.

जिजाऊंचा जन्म ज्या काळात झाला तो काळ पारतंत्र्याचा होता. अशा वातावरणात स्त्री शिक्षणच काय, पुरुषांनाही शिक्षण दिले जात नव्हते. अशा प्रतिकूल परिस्थितीच्या वातावरणात जिजाऊंना युद्ध कलेचे, साक्षरतेचे धडे लखुजीराजे यांनी दिले होते.

जिजाऊसाहेब घोड्यावर बसण्यात तर अगदी पटाईत होत्या. त्यांनी मोगली सैन्य पाठीवर असताना घोड्यावर बसून शत्रूला चकवा दिल्याचे अनेक दाखले इतिहासात प्रसिद्ध आहेत.जिजाऊ साहेब तलवार चालविणे, भालाफेक,धनुष्यबाण चालविणे इत्यादी प्रशिक्षणात तरबेज होत्या.

महाराष्ट्रातील ज्या अनेक घराण्यांनी इतिहास घडवला त्या सिंदखेडकर जाधवरावांच्या घराण्यात जिजाऊंचा जन्म झाला होता. जाधव रावांचा वंश म्हणजे रत्नाची खान होती.जाधवरावांच्या घराण्यातील वीरप्रसू मातांच्या कुशीत एकामागे एक रणधुरंदर असे पराक्रमी पुरुष जन्माला आले होते .याच लखुजीराजे यांच्या पोटी जिजाऊंनी जन्म घेतला होता.अशा या राजमाता जिजाऊंना आमचा मानाचा मुजरा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.