तुळजापूर (जि.उस्मानाबाद ) : भोंग्याच सोडा शेतकऱ्यांच्या विजेच पाहा, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे नाव न घेता लगावला. मंगळवारी (ता.१९) तुळजापूर येथील सर्किट हाऊसवर शेट्टी पत्रकार परिषदेत बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, दुरवास भोजने, धनाजी पेंदे आदी उपस्थित होते. बळीराजा हुंकार यात्रा सोलापूर जिल्ह्यात आहे. तथापि शेट्टी हे तुळजापूर (Tuljapur) येथे येऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या विजेच्या प्रश्नाबाबत सरकारचे लक्ष्य वेधले. शेट्टी पुढे म्हणाले की, आज शेतकऱ्यांचे बळी घेणाऱ्या केंद्रातील सरकारकडे आपला जाण्याचा प्रश्नच नाही. (Raju Shetti Advise Raj Thackeray To Give Up Loudspeakers And Solve Electricity Issue Of Farmers)
राज्यातील आणि केंद्र सरकारमधील विविध प्रश्नांवर त्यांनी आपल मत मांडले. येत्या १ मे पासून गावसभा घेऊन राष्ट्रपतींकडे शेतकऱ्यांच्या मागणीसाठी निवेदन दिले जाणार आहे. शेतकरी भारनियमनाने त्रस्त आहेत. रात्रीची वीज देऊन शेतकऱ्यांच्या मानवी हक्काची पायमल्ली होते. मागील पाच वर्षात रात्रीच्या विजेमुळे किती शेतकऱ्यांचे मृत्यू झाले याची माहिती ही गोळा करण्यात येणार आहे. 'हमीभाव कायदा करावा' अशीही आमची मागणी आहे, असे त्यांनी सांगितले. कोळशाच्या प्रश्नाबाबत विचारले असता ते म्हणाले की, कोणताही उद्योग कोळशाअभावी बंद आहे असे आपण ऐकलेले नाही. तसेच ऊसाच्या प्रश्नाबाबत राज्य सरकार जबाबदार आहे. ऊस किती शिल्लक आहे. त्याचे क्षेत्र किती आहे. याबाबत राज्य सरकारने नियोजन करणे आवश्यक होते असेही ते म्हणाले.
विरोधी पक्ष विरोधकांसारखे वागेना
विरोधी पक्ष विरोधकांसारखे वागत नाहीत. तसेच सत्ताधारी ही तसे वागत नाहीत. विरोधकांना आपण दिल्लीत सत्तेवर असल्याने त्यांच्या चुकासमोर येतील असे वाटते तर महाविकास आघाडी सरकारवरही राजू शेट्टी यांनी टिका केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.