सोयाबिन विकण्याची घाई नको; राजु शेट्टींचं शेतकऱ्यांना कळकळीचं आवाहन

शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
raju shetti
raju shettisakal
Updated on

कोल्हापूर - सोयाबिन हंगामाच्या सुरुवातीला ११ हजार रुपये क्विंटल असणारा दर केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे ४००० ते ४५०० रूपयापर्यंत खाली आला. (Raju shetti) परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या या विवंचनेची दखल घेत स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना भावनिक आवाहन केले आहे. त्यांनी सोशल मिडीयावर सोयाबीन उत्पादकांसाठी (soybean Farmers) भावनिक पोस्ट केली आहे.

raju shetti
'कोल्हापुरात कुणी कितीही गप्पा मारल्या तरी सतेज पाटीलच जिंकणार होते'

यात ते म्हणतात, माझी कळकळीची विनंती !! सोयाबिनच्या हंगामात सुरुवातीला ११ हजार रुपये क्विंटल असणारा दर केंद्र सरकारच्या (Central government) शेतकरी विरोधी धोरणामुळे ४००० ते ४५०० रूपयापर्यंत खाली आला आहे. त्यामुळे आर्थिक दृष्टचक्रात सापडलेला शेतकरी हा कोसळलेला दर पाहून पुन्हा एकदा हतबल झाला. स्वाभिमानी शेतकरी (Swabhimani shetakri sanghatana) संघटनेच्यावतीने ५ नोव्हेंबरपासून मराठवाडा व पश्चिम विदर्भात जनजागृती मेळाव्यासह, विविध आंदोलने, उपोषण करून सरकारच्या धोरणाविरोधात मोर्चे काढण्यात आले. सरकारचे धोरण आणि व्यापाऱ्यांचे संगनमतामुळे कवडीमोल दराने विकला जाणारा सोयाबिन न विकण्याचे आवाहन या जनजागृती सभा आणि मोर्चामध्ये करण्यात आले. वीस दिवसातच ४ हजार रूपये क्विंटलने विकला जाणाऱ्या सोयाबिनचा दर आज ६ हजार ५०० रूपयांवर गेला व तो दिवसेंदिवस वाढू लागला आहे.

अजूनही राज्यातील सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे. सोयापेंड आयात थांबवणे, जी. एस. टी रद्द करणे, निर्यात अनुदान वाढवणे यासह विविध मागण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठपुरावा सुरू आहे. आपण आपला सोयाबिन न विकता अजून थोडे दिवस थांबल्यास निश्चितच हा दर ८५०० रूपयाच्या पुढे जाईल. अवघ्या वीस दिवसात क्विंटल पाठीमागे जवळपास २ ते २५०० हजार रूपये अधिकचा दर राज्यातील सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना मिळू लागला सोयाबिनच्या हंगामा सुरुवातीला ११ हजार रुपये क्विंटल असणारा दर केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे ४००० ते ४५०० रूपयापर्यंत खाली आला.

raju shetti
Omicron : पाकिस्तानसह ७ देशांची दक्षिण आफ्रिकेतून प्रवासावर बंदी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.